मराठमोळी अभिनेत्री उमा भेंडे यांची सून आहे हिंदी मालिका क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री…

मराठी सिनेसृष्टीत खूप सार्‍या लोकप्रिय अभिनेत्री होऊन गेले आहेत. त्यांच्या कामातून त्यांनी आज देखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अशीच एक दमदार अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे होय. अभिनेत्री उमा भेंडे यांना आजही प्रेक्षक आवडीने पाहत असतात. उमा भेंडे यांचे मूळ नाव हे उमा भेंडे नसून हे त्यांना लतादीदी यांनी भेट म्हणून हे नाव दिले आहे त्यांचे खरे नाव अनसूया साकरीकर असे होय. मूळच्या कोल्हापूर येथील रहिवासी असणाऱ्या उमा भेंडे यांनी आकाशगंगा या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. आकाशगंगा या चित्रपटानंतर त्यांनी मधुचंद्र, आम्ही जातो अमुच्या गावा, दोस्ती, काका मला वाचवा, भालू, स्वयंवर झाले सीतेचे यांसारख्या चित्रपटात काम केले. उमा भेंडे यांनी मराठीच नव्हे तर तेलगु तमिळ छत्तीसगडी या भाषेमधून त्यांच्या अभिनयाची एक वेगळी ओळख निर्माण केली.

अभिनेत्री उमा भेंडे यांनी आपला जीवनसाथी म्हणून मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांच्याशी विवाह केला. प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे यांनी ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे इथूनच त्यांची ओळख झाली आणि मग त्यांनी विवाह केला. यानंतर प्रकाश भेंडे यांची निर्मिती संस्था ‘श्री प्रसाद चित्र’ यातून त्यांनी भालू, प्रेमासाठी वाट्टेल ते, चटकचांदनी यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. आपल्या अभिनयाने उमा भेंडे यांनी प्रेक्षकांच्या मनात आज देखील घर केले आहे. परंतु उमा भेंडे यांचा १९ जुलै २०१७ रोजी आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांना दोन मुले आहेत ज्यांची नावे प्रसाद आणि प्रसन्न अशी आहेत. प्रकाश भेंडे यांचा थोरला मुलगा म्हणजे प्रसाद भेंडे हा सिनेमॅटोग्राफर म्हणून सिनेसृष्टीत काम करत असतो. प्रसाद चा पहिला चित्रपट ‘दुनियादारी’ हातची साठी खूप लाभदायी ठरला यातूनच त्याला यश प्राप्त झाले. दुनियादारी या चित्रपटामुळे खूप सारे अवार्ड्स मिळाले. यानंतर प्रसादने लोकमान्य, मितवा, वेलकम जिंदगी, प्यारवाली लव्हस्टोरी, मला काहीच प्रॉब्लेम नाही, सविता दामोदर परांजपे, बेफाम, सातारचा सलमान यांसारख्या चित्रपटात सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केले आणि आपली एक वेगळी छाप निर्माण केली.

View this post on Instagram

A post shared by PRASAD BHENDE (@prasad_bhende)

प्रसादला लोकमान्य या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर म्हणून पुरस्कृत करण्यात आले. आपल्या आईप्रमाणे कॅमेरासमोर न काम करता कॅमेरा मागे काम करून एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल ठेवले. प्रसाद यांनी हिंदी मालिका शेत्रातील अभिनेत्री श्वेता महाडिक भेंडे यांच्याशी विवाह केला.
श्वेता महाडिकने गुड्डन तुमसे ना हो पायेगा, कृष्णदासी, एक श्रीनगर स्वाभिमान यांसारख्या हिंदी मालिकेत काम केले आहे. उमा भेंडे यांची सून हिंदी मालिकेत आपले नाव कमवत आहे. काही जणांना माहित नसेल कि श्वेताने लोकमान्य चित्रपटात टिळकांची बायको सत्यभामाबाईंची भूमिका साकारली होती. प्रसाद आणि श्वेता यांना अभिर हा मुलगा आहे.