काजोल आणि अजय देवगणची मुलगी झाली आहे मोठी! आता दिसते अशी…

बॉलिवूडमध्ये स्टार किड्स वर नेहमीच लक्ष ठेवलं जातं. जेवढं लक्ष या स्टार कपल्स वर असतं, तेवढंच लक्ष प्रसार माध्यमे त्यांच्या मुलांकडेही देतात. सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स आहेत. काही स्टार किड्सचे फोटो कायमच प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसतात, तर काही कलाकारांची मुलं मात्र लाइमलाईट पासून लांब राहणंच पसंत करतात. अशाच काही स्टार किड्स मध्ये होती अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोलची मुलगी न्यासा देवगण.

२४ फेब्रुवारी १९९९ रोजी काजोल आणि अजय देवगण यांचं लग्न झालं. त्यानंतर २० एप्रिल २००३ रोजी न्यासाचा जन्म झाला. न्यासाला पहिल्यापासूनच कॅमेऱ्याची भीती वाटायची. त्यामुळे अजय देवगण आपल्या मुलीला कायम प्रसार माध्यमांपासून लांब ठेवायचा. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये न्यासा बऱ्याच वेळा प्रसार माध्यमांसमोर आली आहे. तिची कॅमेऱ्याची भीती बरीच कमी झाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nysa devgan ♡ (@nysadevganx)

अलीकडेच ती आपल्या आईसोबत म्हणजेच अभिनेत्री काजोल सोबत विमानतळावर दिसली होती. त्यावेळी ती खूपच स्टायलिश दिसत होती. प्रसार माध्यमांनी तिचे अनेक फोटो काढले. तिने ते काढू दिले. या फोटोंमध्ये ती खूपच मॉडर्न आणि सुंदर दिसत आहे. न्यासाचे लहानपणीचे काही फोटो इंटरनेट वर मिळतात. पण आता न्यासा मोठी झाली आहे. तिचे आधीचे फोटो आणि आताचे फोटो पाहिल्यावर लक्षात येते, की ती दिवसेंदिवस खूपच सुंदर आणि आकर्षक दिसू लागली आहे.

काही दिवसांपूर्वी न्यासा देवगणला मुंबईच्या एका रेस्टॉरंट बाहेर पाहिले गेले होते. आपल्या काही मित्रमैत्रिणींसह ती या रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी आली होती. न्यासा बाहेर येताच प्रसार माध्यमांनी तिच्याभोवती गर्दी करत तिचे फोटो काढायला सुरुवात केली. यावेळी न घाबरता न्यासा प्रसार माध्यमांना सामोरी गेलेली पाहायला मिळाली. तिचे हे फोटो देखील बरेच व्हायरल झाले होते. या फोटोंमध्येही ती खूप सुंदर दिसत होती.

View this post on Instagram

A post shared by Nysa devgan ♡ (@nysadevganx)

तसं पाहायला गेलं तर न्यासामध्ये आपल्या दोन्ही पालकांची छबी पाहायला मिळते. पण न्यासा बरीचशी आपल्या आईसारखी दिसते. अनेक स्टार किड्स प्रमाणे न्यासा देखील आपल्या आई-वडीलांच्या पावलावर पाऊल टाकून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडलेला असतो. मात्र त्याबाबत अजून कोणतीही माहिती हाती लागू शकलेली नाही. मात्र न्यासाने चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय घेतला, तर अर्थातच तिच्याकडून प्रेक्षकांच्या बऱ्याच अपेक्षा असतील.