प्रियांका चोप्रा आणि निक जोनास मध्ये दुरावा! प्रियांकाने उचलले मोठे पाऊल…

बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असते. तिच्या यशस्वी करिअर बरोबरच सगळ्यात जास्त लक्षात राहिलं ते तिचं लग्न. २०१८ मध्ये तिने अमेरिकन पॉप सिंगर आणि अभिनेता निक जोनास बरोबर लग्न केलं. आपल्यापेक्षा वयाने बराच लहान असलेल्या निक बरोबर लग्न केल्यानंतर तिला बरंच ट्रोल देखील करण्यात आलं होतं. मात्र तिच्या चाहत्यांनी तिच्या निर्णयाचं स्वागत करत तिला पाठींबा दर्शवला होता.

प्रियांका नेहमीच आपल्या निक बरोबरच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसते. तिच्यात आणि निक मध्ये असलेलं प्रेम ते दोघे नेहमीच जगजाहीर करत आले आहेत. मात्र सध्या या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे चित्र आहे. सध्या हा केवळ अंदाज असला तरी असा अंदाज बांधण्यामागे कारणही तसेच घडले आहे. प्रियांका लग्न झाल्यापासून आपले नाव ‘प्रियांका चोप्रा जोनास’ असे लावते. सोशल मीडिया वरही तिचे तेच नाव आहे. मात्र सध्या तिने हे नाव बदलून केवळ ‘प्रियांका चोप्रा’ ठेवले असलेले दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

तिच्या या निर्णयामुळे तिच्यात आणि निक मध्ये तणाव निर्माण झाल्याचा अंदाज बांधण्यात येत आहे. लवकरच हे दोघे घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आल्याचे चित्र आहे. चाहत्यांमध्ये निक आणि प्रियांकाची जोडी खूप प्रसिद्ध आहे. प्रियांकाच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये सध्या उलटसुलट चर्चा होताना दिसत आहेत. या दोघांमधील घटस्फोटाच्या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

दरम्यान प्रियांका चोप्रा किंवा निक जोनास या दोघांपैकी कोणाकडूनही याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. दोघांपैकी कुणीही यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही, तसेच दोघांनीही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रियांका आणि निकच्या घटस्फोटावरून बराच गोंधळ असल्याचे दिसत आहे.

काही वृत्तांच्या मते, प्रियांकाची आई मधू चोप्रा यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी प्रियांका आणि निक जोनास मधील बेबनावाचे वृत्त फेटाळून लावले आहे. त्यांनी सांगितले आहे, की हे वृत्त केवळ एक अफवा आहे. अशा अफवा न पसरवण्याबाबत त्यांनी आवाहन केले आहे. प्रियांका चोप्रा किंवा निक जोनास यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आल्याशिवाय या गोष्टींवर विश्वास ठेवता येणार नाही.

तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना भेट द्या. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.