बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला होणार सुरुवात, कलाकारांची यादी जाहीर.

मित्रहो मराठी वाहिनीवर अनेक शो प्रसिद्ध आणि लोकप्रिय होत असतात. या शोज नी प्रेक्षकांना अगदी वेड लावले असून सोशल मीडियावर खूप चर्चा रंगवतात. नुकताच बिग बॉस मराठी चा तिसरा पर्व संपला आहे, त्यामुळे सर्वत्र या पर्वाची जोरदार चर्चा सुरू होती. सोशल मीडियावर याबाबतीत अनेक खबरी व्हायरल होत होत्या. तसेच या तिसऱ्या पर्वातील कलाकारांच्या बद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जात होत्या.

बिग बॉसचा तिसरा सिझन खूपच लक्षवेधी ठरला होता, या सिझन मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही आणि हा खेळ पाहणाऱ्या प्रेक्षकांनाही खूप मजा आली होती. या शोने अनेकांना आपली सवय लावली होती आणि म्हणून तर याचे चाहते आता बिग बॉसच्या चौथ्या सिझनच्या प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण प्रश्न करत आहेत, हा सिझन कधी सुरू होणार शिवाय यामध्ये आता कोणकोणते कलाकार पाहायला मिळणार..?

तर मित्रहो आपण आज या लेखातून जाणून घेऊ की बिग बॉस सिझन ४ मध्ये कोणकोणते कलाकार आपल्या भेटीस येणार आहेत. या मराठी बिग बॉसचे चौथे पर्व मे किंवा एप्रिल मध्ये सुरू होणार असून याची तयारी देखील जोरात सुरू आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांची एक यादी समोर आली आहे, त्यामध्ये प्रथम आहे शुभांगी गोखले. शुभांगी यांनी “येऊ कशी तशी मी नांदायला” या मालिकेतून लोकप्रियता मिळवली आहे.

तसेच रुचिरा जाधव ही देखील आता यामध्ये झळकणार आहे. निखिल चव्हाण सुद्धा चौथ्या सिझन मध्ये दिसणार आहे. तो “कारभारी लयभारी” या मालिकेत आपल्याला पाहायला मिळाला होता. तसेच यामध्ये अश्विनी भावे सुद्धा दिसणार आहे. आणखीन एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे किरण माने ही देखील चौथ्या सिझन मध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच अनिता दाते सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे.अनिता आपणाला “माझ्या नवऱ्याची बायको” या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिका ‘राधिका’ मध्ये पाहायला मिळाली होती.

तसेच अक्षय केळकर आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव हा सुद्धा दिसणार असून श्रमा देशपांडे आणि मृणाल दुसानिस देखील आपल्या भेटीस येणार आहे. हे सर्व कलाकार रसिकांच्या पसंतीस पात्र ठरलेलेच आहेत. मात्र आता यापैकी कोणकोणते कलाकार बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वा मध्ये पाहायला मिळणार हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर मित्रहो आजचा हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.