बॉलीवूडमधील हि प्रसिद्ध अभिनेत्री आता चित्रपट सोडून करतेय बिजनेस, कमावते इतके कि..

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि प्रसिद्ध अभिनेता आमिर खान या दोन प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर अभिनेत्री आयशा जुल्का हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्या काळी तिने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तिने अनेक सुपरहिट चित्रटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र, तिने अचानक चित्रपट सृष्टीला राम राम ठोकला. आता ही अभिनेत्री अभिनय सोडून बिजनेस करत आहे.

आता ही अभिनेत्री तिचा कंस्ट्रक्शनचा बिजनेस आणि ‘स्पा’चा बिजनेस करत आहे. आयशा जुल्काने 1883 मध्ये तिच्या करिअरला सुरुवात केली. तिचा पहिला चित्रपट ‘कैसे कैसे लोग’ हा होता. याच चित्रपटातून तिने बॉलिूडमध्ये तिची ओळख निर्माण केली. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले.

आयशा जुल्काने अक्षय कुमार, आमिर खान सलमान खान,अजय देवगन, गोविंदा, या कलाकारांसोबत काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये 52 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बॉलीवूड व्यतिरिक्त, ओडिया, कन्नड आणि तेलगू या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

आयशा जुल्का 2006 पर्यंत बॉलीवूमध्ये सतत काम करत होती. मात्र, ती अचानकपणे बॉलिवूड सृष्टीतून गायब झाली. तिने 2003 मध्ये बिजनेसमॅन समीर वाशी याच्यासोबत लग्नगाठ बांधली. तिने गुपचूप लग्न केले होते. मात्र, काही काळानंतर बॉलीवूड सृष्टी सोडून ती पतीसोबत बिजनेस सांभाळू लागली.

दरम्यान, आयशा जुल्का आता करोडोंची मालकीण आहे. ती आता कंस्ट्रक्शनचा बिजनेस आणि ‘स्पा’चा बिजनेस करत आहे. त्याचे नाव सैमरॉक डेव्हलपर्स आहे. त्याचबरोबर तिने ऑडियन्स नावाचा कपड्यांचा ब्रँड देखील तयार केला आहे. ती एक उत्कृष्ट डिझायनर आहे.