दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचे घर आहे इतके मोठे.! लोक म्हणाले हा आहे राजामाणूस…

मित्रहो सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या चर्चा रंगत असतात. खास करून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांच्या लक्झरी लाईफ बद्दल नेहमीच चर्चा रंगलेली असते. यामध्ये अनेक कलाकार आपल्या वयक्तिक आयुष्याची माहिती देत असतात, आज आपण अशाच एका सुपरस्टारची माहिती घेणार आहोत ज्याने आपल्या कलेच्या जोरावर प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. हा अभिनेता आहे अल्लू अर्जुन, जो अनेक तरुणींचा आवडता अभिनेता आहे.

त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट “पुष्पा” चांगलाच चर्चेत आला आहे, तसेच त्यातील त्याचा हटके अभिनय तर क्षणात मन जिंकतो आहे. त्याचा यातील लुक सुद्धा आकर्षक वाटत आहे, त्यामुळे त्याचे चाहते आणखीनच त्याच्यावर प्रेम करत आहेत. सर्वत्र सोशल मीडियावर त्याच्या चित्रपटाचीच चार सुरू आहे. अल्लू अर्जूनने चित्रपटाच्या माध्यमातून भरपूर पैसे मिळवले आहेत. त्याची संपत्ती अनेकांना आकर्षित करते, त्याचे घर देखील खूपच सुंदर आहे.

सोशल मीडियावर त्याच्या घराचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत, त्याचा परिवार सुद्धा नेहमी आपल्याला पाहायला मिळतो. सोशल मीडियावर अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी खुप सक्रिय असतात. त्यांची प्रेमकहाणी सुद्धा खूपच रंजक आहे, अल्लू अर्जुनने आपल्या जवळच्या मित्राच्या लग्नात स्नेहाला पाहिले होते. पहिल्या क्षणीच स्नेहा त्याला आवडली होती, आणि त्या दोघांनी एकमेकांना तेव्हाच एकमेकांचा नंबर दिला होता. त्यांचं बोलणं, भेटणं पूढे सुरू झालं आणि बघता बघता दोघेही प्रेमात पडले.

त्या दोघांनी ६ मार्च २०११ रोजी लग्नगाठ बांधली, स्नेहा ही के सी शेखर रेड्डी या प्रसिद्ध व्यवसायिकेची मुलगी असून तिने अमेरिकेतून शिक्षण घेतले आहे. या जोडप्याला अहान आणि अरहा अशी दोन गोंडस मुले आहेत. अल्लू अर्जुन हैदराबाद मधील ज्युबिली हिल्स मध्ये राहतो. बाहेरून त्याच घर तसे साधेच दिसते मात्र त्याच्या घरात आतमध्ये जी सिस्टीम आहे ती पाहून कोणीही थक्क होऊन जाईल. त्याच साधं घर हे सर्व सोयींयुक्त परिपूर्ण आहे, आतमध्ये भलेमोठे किचन, हॉल, बेडरूम, तसेच स्विमिंग पूल सुद्धा आहे.

View this post on Instagram

A post shared by Lovely Lucky (@lovelylucky684)

घराचे इंटेरिअर डिझायनर आमिर आणि हमीदा हे आहेत, त्यांनी हे घर खरच खूप छान सजवलं आहे. यामध्ये विशेष असे की घरासाठी त्यांनी पांढऱ्या रंगाचे रेखाटन दिले आहे. खूपच आकर्षक वाटत त्याचे घर. तुम्ही सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो पाहू शकता. तर मित्रहो आजचा हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.