सलमानच्या संपत्तीचा वारस बनणार ही व्यक्ती, स्वतः अभिनेता सलमान खानने केला मोठा खुलासा.

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकारांच्या मध्ये अभिनेता सलमान खान हे सर्वात जास्त लोकप्रिय आहेत. फक्त देशातच न्हवे तर अगदी जगभरात त्यांची ख्याती आहेच. भाईजान नावाने त्यांची विशेष ओळख आहे, त्यामुळे एक आदर मान सन्मान नेहमी इंडस्ट्री मध्ये त्यांना दिला जातो. आजवर सलमानने अनेक चित्रपटात काम केले आहे, त्यांचे खूपसे चित्रपट आपल्या भेटीस आले असून चांगलेच गाजलेले आहेत. आजसुद्धा त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. आपल्या अतरंगी अभिनयातून आणि जबरदस्त लुक मधून त्यांनी आजवर आपली प्रसिद्धी आणि लोकप्रियता जपली आहे.

फिल्म इंडस्ट्री मधील सर्व रसिकांना, तसेच इतर कलाकारांना देखील त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सलमान भाईचे लग्न म्हणजे इंडस्ट्री मध्ये नेहमीच एक चर्चेचा विषय राहीला आहे. आज त्यांचे वय जवळपास ५६ वर्षे आहे, शिवाय अनेक मुली त्यांच्या गर्लफ्रेंड देखील राहिल्या आहेत. पण तरीही त्यांनी कोणासोबतच लग्न केले नाही. आजवर ते अविवाहित आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक मुलींनी त्यांना प्रपोज केले आहे पण त्यांनी आपली लग्नगाठ कोणाशीच बांधली नाही. त्यामुळे आजदेखील त्यांना खूपशा तरुणी लग्नासाठी मागणी घालतात.

सलमानने आपल्या अभिनयाच्या बळावर भरपूर संपत्ती मिळवली आहे, पण तो अविवाहित असल्याने त्याच्यानंतर त्याच्या मृत्यूचा वारस कोण असेल याची सर्वानाच उत्सुकता लागलेली असते. पण मित्रहो नुकताच सलमानने या बाबतीत खुलासा केला आहे. नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये सलमान म्हणतात की जर पुढे जाऊन त्यांनी लग्न केले तर त्यांच्या संपत्ती मधील अर्धा वाटा त्यांच्या परिवाराला मिळेल व अर्धा वाटा ट्रस्टच्या नावावर जाईल. तसेच पुढे अभिनेता म्हणाले की जर पुढे जाऊन त्यांनी लग्न केले नाही तर त्यांची संपूर्ण संपत्ती ट्रस्टच्या नावावर होईल.

अभिनेता सलमान खान यांनी या कलाविश्वात नाविन्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यामुळे भरपूर संपत्ती देखील त्यांनी मिळवली आहे. मित्रहो आपण पाहिले तर आजच्या काळात अभिनेता सलमान खान हे अरबपती आहेत. अगदी बक्कळ पैसा त्यांच्याकडे आहे, त्यामुळे त्यांचे जगणे खूपच शानदार पध्दतीने आहे. आपले जीवन ते अगदी शानदार पद्धतीत व्यथित करतात, सर्व सुखसोयी त्यांच्या पायथ्याशी लोळण घेतात. त्यामुळे अनेकांना त्यांच्या जगण्याचा हेवा वाटतोच. त्यांच्या अनेक चाहत्यांना नेहमीच त्यांच्या संपत्ती बद्दल जाणून घेताना आश्चर्य वाटते.

आजच्या घडीला अभिनेता सलमान खान जवळ २४०० करोडोंची प्रॉपर्टी आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या जवळ अनेक प्रकारच्या, महागड्या गाड्या देखील आहेत. खूपसे आलिशान बंगले सुद्धा आहेतच, गाड्या, बंगले आणि भरपूर पैसे असल्याने देशभरातील सर्व चाहत्यांना त्यांचा हेवा वाटतो. मात्र विशेष म्हणजे त्यांनी जर लग्न केले नाही, तर ही सर्व संपत्ती ट्रस्टच्या नावे होणार आहे. पण काहीही झाले तरी संपत्ती हुन अधिक त्यांनी चाहते देखील मिळवले आहेत. त्यामुळे संपत्ती सह रसिकांच्या मनावर देखील अधिराज्य गाजवतात. त्यांची लोकप्रियता अशीच वाढत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.