एकेकाळी कचरा गोळा करून कमवले पैसे, आता आहे उत्कृष्ठ क्रिकेटर..असा बनला युनिवर्सल बॉस..

क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतो अनेक खेळाडू अनेक वेगवेगळ्या खेळी करून आपले क्रिकेटमध्ये स्थान तयार करतात. यासाठी त्यांना प्रचंड प्रयत्न करावे लागतात. अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. तेव्हा कुठे पुढे जावून ते क्रिकेट विश्वात आपले नाव कमवतात. असे अनेक खेळाडू आहेत की, त्यांनी क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी पैसे मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. जे मिळेल ते काम केले आहे.

क्रिकेट विश्वामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या दमदार कामगिरीने लोकांना खूप प्रभावित केले. या क्रिकेट खेळाडूंचा सर्वोत्कृष्ट खेळ कधीच विसरला जाऊ शकत नाही. यापैकी आज अशाच खेळाडू बद्दल बोलणार आहोत. यातील एका खेळाडूचे नाव आहे “ख्रिस गेल”. त्याच फक्त नाव जरी ऐकले तरी चागल्या गोलंदाजांना देखील घाम सुटतो.

जेव्हा जेव्हा ख्रिस गेल फलंदाजीसाठी मैदानात उतरतो तेव्हा संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्या वाजवून त्याला त्याचे चाहते प्रचंड प्रोत्साहन देतात. त्याने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. हा एक फलंदाज आहे ज्याच्या समोर कोणताही गोलंदाज उभे राहू शकत नाही. त्याने त्याच्या उत्तम खेळीने चाहत्यांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे. जेव्हा तो क्रीजवर असतो. तेव्हा विरोधी संघाची परिस्थिती प्रचंड बिकट होते.

ख्रिस गेलने अनेक विक्रम मोडले आहेत. टी -20 मध्ये त्याने अशी अनेक विक्रम कामगिरी केली आहे की, दुसऱ्या खेळाडूंना तिथपर्यंत पोहोचणे प्रचंड कठीण आहे. प्रत्येक फलंदाजाचे येथे पोहोचण्याचे स्वप्न असते. जरी ख्रिस गेलने आपल्या जीवनात चांगले स्थान मिळवले आहे, पण त्यामागील त्याची कठोर परिश्रम आहे . या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्याने आयुष्यात प्रचंड संघर्ष केला आहे.

ख्रिस गेल कचरा उचलून पोट भरायचा
प्रत्येकजण आयुष्यात परिसस्थितीशी संघर्ष करून आपल्या ध्येय गाठत असतो. ख्रिस गेलने देखील आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला. त्याने प्रचंड मेहनत करून यश प्राप्ती करून कोट्यावधी लोकांचे मन जिंकले आहे. मात्र, त्याच्याबद्दल एक गोष्ट आहे की, एके काळी त्याला गरीब परिस्थितीमुळे कचरा गोळा करून पैसे कमवावे लागत होते.

ख्रिस गेलचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी वेस्ट इंडिजच्या जमैका येथे झाला होता. त्याचे वडील डडले गेल पोलिस होते. त्याची आई रस्त्याच्या कडेला शेंगदाणे विकत असे. त्याचे कुटुंब झोपडीत राहत होते. कुटूंबाच्या मदतीसाठी ख्रिस गेल कचरा गोळा करून तो विकून पैसे कमवत होता. त्यातूनच तो त्याच्या कुटूंबाला मदत करायचा. त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती. कधी कधी तर जेवण देखील मिळत नव्हते. त्याच्या परिस्थिती कमकुवत असल्याने त्याला अभ्यास देखील करता येत नव्हता.

ख्रिस गेलची जिद्द
ख्रिस गेल गरीब होता. मात्र, त्याची जिद्द मजबूत होती. ख्रिस गेलला क्रिकेट खूप आवडत होते. मात्र, त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती आणि दुसरीकडे त्याच क्रिकेटर बनण्याच स्वप्न होत. अकॅडमि जॉईन करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मात्र, तरी देखील त्याने हार न मानता ध्येकडे वाटचाल करत राहिला. त्याने फलंदाजी बरोबर गोलंदाजी देखील केली. वयाच्या 19 व्या वर्षी आपल्या मेहनत आणि समर्पणाने जमैकाकडून पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली.

1998 साली झालेल्या प्रथम श्रेणी सामन्यात ख्रिस गेलने त्याच्या फलंदाजीने सर्वांना चकित केले. त्याने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्याकडे त्याचे राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष लागले आणि त्याला राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी मिळाली. 1999 मध्ये त्याने पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्याने खूप गरिबीतून वाटचाल करत ध्येय गाठले. त्याला प्रचंड आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्याने एकेकाळी कचरा गोळा करून पैसे कमवत पोट भरले होते आणि आज तो या एक उत्तम क्रिकेटर आहे.