“झुंड” चित्रपट ज्यांच्यावर आधारीत आहे ते विजय सर, जाणून घ्या त्यांच्या बद्दल

मित्रहो अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत, त्यांच्या नवनवीन कथानकाला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट “झुंड” भलताच गाजत आहे, चित्रपटातील कलाकार व त्याची कथा विशेष आकर्षनिय ठरतेय. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शक म्हणून या चित्रपटात काम केले आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने पहिल्याच झटक्यात प्रचंड कमाई केली आहे. अनेक लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटर मध्ये गर्दी करत आहेत, तसेच सोशल मीडियावर देखील या चित्रपटाबद्दल आपली कमेन्ट कळवत आहेत. खूपसे कलाकार सुद्धा नागराज यांचे कौतुक करत आहेत.

या चित्रपटाचे कौतुक तर होतच आहे पण दुसरीकडे यावर काहीशी टीका देखील केली जात आहे. चित्रपटात वंचित घटकासाठी कथानक आकारण्यात आले आहे पण मधेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना का चित्रपटात घेतले असा अनेकजण प्रश्न करत आहेत. हा चित्रपट एका सत्य कथेला अनुसरून आहे, यामध्ये नागपूर मधील एका व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा चित्रपट चित्रित करण्यात आला आहे. हा चित्रपट नागपूर मधील विजय बारसे यांच्या आयुष्यातील काही घटनांना पडद्यावर दाखवून देत आहे.

काही वर्षांपूर्वी त्यांनी झोपडपट्टी मधील मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले होते. त्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे, यामध्ये फुटबॉल प्रशिक्षक म्हणून अमिताभ बच्चन यांनी काम केले आहे. तसेच चित्रपटात “सैराट” फेम आर्ची परशा यांनी देखील हजेरी लावली आहे, रिंकू राजगुरू व आकाश ठोसर हे सुद्धा चित्रपटात झळकले आहेत. याआधी त्यांना आपण जेव्हा पहिल्यांदा पडद्यावर पाहिले होते तेव्हा सर्वत्र चर्चेला उधाण आले होते. त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. आता पुन्हा एकदा “झुंड” मध्ये त्यांना पाहताना प्रेक्षकांना खूप छान वाटत आहे.

नागराज मंजुळे यांनी आपल्या चित्रपटातून विजय बारसे यांनी झोपडपट्टी मधील मुलांसाठी केलेले महान कार्य जगाला दाखवले आहे. विजय हे नागपूर मधील एका कॉलेज मध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. विशेष म्हणजे त्यांनी आपले शिक्षण झोपडपट्टीच्या मुलांना देण्याचा विचार केला व तो अमलात देखील आणला. त्यांनी झोपडपट्टी मधील मुलांना फुटबॉल प्रशिक्षण देऊन त्यांना खेळाडू बनवले. तसेच त्यांनी “स्लम सॉकर” नावाच्या लीगची सुद्धा स्थापना केली आहे. त्यांच्या या कामाची ओळख अमीर खानच्या “सत्यमेव जयते” या कार्यक्रमात देखील करण्यात आली होती.

विजय बारसे हे २००० सालच्या दरम्यान नागपूरच्या हिसलॉप कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. तेव्हा त्यांनी काही मुलांचे निरीक्षण केले तर ती मुले भर पावसात एका तुटलेल्या बादलीला पायाने लाथा मारताना दिसत होते. त्याच्या भोवतीने खेळताना दिसत होते. विजय यांनी नंतर त्या मुलांना आपला फुटबॉल दिला, तो त्यांनी खूप आनंदाने स्वीकारला. त्यानंतर विजय यांनी आपल्या कार्याच्या माध्यमातून २००२ साली “झोपडपट्टी फुटबॉल लीग” ची स्थापना केली. नंतर नंतर हा खेळ “स्लम सॉकर” नावाने प्रसिद्ध होऊ लागला.

विजय यांनी त्या मुलांना प्रशिक्षण देऊन माणुसकीचा व गुरूचा दर्जा प्रचंड वाढवला आहे. त्यांच्या कार्याला शतदा सलाम देखील अपुरा आहे. एक गुरू या नात्याने त्यांनी निस्वार्थ पणे हे काम केले आणि म्हणूनच आज संपूर्ण जगासमोर याची माहिती चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर दिसत आहे. या चित्रपटातील हा संदेश प्रत्येकाच्या लक्षात येवो व अशीच माणुसकी जपणाऱ्यांची झुंड तयार होवो. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.