प्रेग्नन्सीची चर्चा सुरू असतानाच फरहान शिबाणीच्या लग्नाचं खरे कारण आले समोर….जाणून घ्या तुम्हीही..

मित्रहो बघता बघता अनेक जोड्या लग्नगाठ बांधून संसार थाटत आहेत. अनेकजण सोशल मीडियावर आपल्या जोडीदाराबद्दल सांगून नेटकऱ्यांना थक्क करत आहेत, दरम्यान आणखी एक जोडी विशेष लक्ष वेधून घेत आहे. यातील फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर काही दिवसांपूर्वीच लग्नबेडीत अडकले आहेत. सोशल मीडियावर मात्र ही बातमी अजूनही ताजी होऊन राहिली आहे. अनेकजण याबद्दल विशेष चर्चा रंगवत आहेत. सोशल मीडियावर हे दोघे आपल्या लग्नाबद्दल अनेकांच्या प्रश्नांना सामोरे जात आहेत.

शिवाय इतकेच नसून त्यांच्या लग्नाचे कारण शिबानी दांडेकर प्रेग्नन्सी असल्याची चर्चा जोरदार सूर होती. ही अफवा अगदी वाऱ्यासारखी वेग घेत होती. शिबानी प्रेग्नंट आहे आणि म्हणून या दोघांनी लग्नाला घाई केली असावी असे सर्वांचे मत होते. त्यामुळे या दोघांना सोशल मीडियावर अनेकजण कमेन्ट द्वारे लग्नाचे कारण विचारत होते. पण आता सर्वांच्याच विचारसरणीवर ब्रेक लावत शिबानी दांडेकर हीने आपल्या लग्नाचे मूळ कारण सांगितले आहे. तिने काही दिवसांपूर्वी फरहान अख्तर सोबत लग्न केले आहे, तिची आणि फरहानची जोडी खूप छान आहे.

हे जोडपं २०१६ पासून एकमेकांना डेट करत होते, आपल्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर आता त्याने शिबानी सोबत आपल्या नात्याची नव्याने सुरुवात केली आहे. सर्वांसमोर शिबानीला स्वीकारले आहे, लग्नाचे काही फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघेही खूप खुष दिसत आहेत. मैत्री सह प्रेमाचा टप्पा ओलांडत दोघांनी आपल्या नात्याची पती पत्नी बनून सुरुवात केली आहे. आपल्या आयुष्यातील भूतकाळ विसरून वर्तमान एकमेकांच्या सानिध्यात राहून सजवत आहेत.

या जोडप्याचा विवाह सोहळा खंडाळा येथील जावेद अख्तर यांच्या फार्महाऊसवर मोठ्या थाटात साजरा करण्यात आला होता. अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या दोघांनी लग्न केले आहे, दरम्यान शिबानीने एक पोस्ट शेअर करत फरहान सोबत लग्न करण्याचे खरे कारण स्पष्ट केले आहे. दिग्दर्शिका आणि उत्तम कोरियोग्राफर असलेली फराह खान हीने महिला दिनानिमित्त इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती ज्यामध्ये तिने शिबानीला “वहिनी” असे संबोधले होते. तिच्या या स्टोरीवरच एक पोस्ट शेअर करत शिबाणीने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

शिबानी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणते की “तुमची वहिनी होण्यासाठीच मी फरहान सोबत लग्न केलं आहे”, ही पोस्ट पाहून सर्वजण चकित झाले आहेत. कारण शिबानी प्रेग्नंट असल्याने त्या दोघांनी लग्नाला गडबड केली अशी चर्चा सर्वत्र चालू असताना शिबाणीने या सगळ्यावर बंदी आणत खरे कारण समोर स्पष्ट केले आहे. तसेच व्हिडीओ व फोटोमध्ये पोट दिसण्यामागील कारण स्पष्ट करत तिने सांगितले की “मी एक स्त्री आहे आणि मी प्रेग्नंट नाहीये, हे केवळ टकीलामुळे झाले होते.”

आता मात्र शिबानी आणि फरहान दोघेही आपले वैवाहिक जीवन खूपच आनंदाने जगत आहेत. त्यांच्या भावी आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.