दुःखद निधन..! अक्षय कुमारच्या कुटुंबातून आली दुःखद बातमी..भावुक झाले वातावरण

मित्रहो बॉलिवूड स्टार अक्षय कुमार प्रचंड लोकप्रिय आहे, त्याच्या अनेक भूमिकांनी यशाचे शिखर गाठले आहे. एक सामान्य कलाकार ते बॉलिवूड मधील सुपरस्टार असा त्याचा प्रवास सुरु आहे. त्याच्या प्रवासात आजवर अनेक अडथळे आले होते, येत असतात. पण त्यांच्याशी त्याने खंबीरपणे उभे राहून टक्कर दिली आहे. मात्र मागील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या आधी काही दिवस त्याच्या आईचे दुःखद निधन झाले होते. आपल्या आयुष्यात आईचे महत्व अनन्यसाधारण असते, त्यामुळे जेव्हा आई सोडून गेली तेव्हा तो खूप दुःखी झाला होता.

मात्र त्याने स्वतःला सावरले, व पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली. अनेक चित्रपट त्याचे पडद्यावर प्रदर्शित झाले असून, हे नवे चित्रपट देखील लक्षवेधी ठरले आहेत. दिवसेंदिवस त्याच्या अभिनयातील दर्जेदारपणा आणखीन विलक्षण ठरत आहे. त्याचे यश पाहून त्याचे सर्व चाहते खूप खुश आहेत, मात्र असे असतानाच आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सर्वजण खूपच भावुक होऊन अक्षयची पोस्ट पाहत आहेत,तसेच त्यावर कमेन्ट करत आपल्या देखील भावना व्यक्त करत आहेत.

अक्षय कुमार याच्या घरातील एक सदस्य नुकताच निधन पावला आहे, हा सदस्य म्हणजे त्याच्या घरचा पाळीव कुत्रा आहे. अक्षयने इन्स्टाग्रामवरून आपल्या अकाउंटवर एक भावुक पोस्ट शेअर करत ही बातमी कळवली आहे. सोबतच त्याने आपली पत्नी व कुत्र्यासह आपला एक फोटो देखील शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये तुम्ही कुत्र्याला पाहू शकता, तसेच अभिनेत्री व अभिनेता अक्षय कुमार दोघेही किती आनंदाने त्याच्याजवळ उभे आहेत. हा फोटो आणखीनच भावुक करतो, या पोस्टवर अनेकांनी कमेन्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय आपल्या कुत्र्याचा फोटो शेअर करत खाली म्हणतो की “तू आमच्या हृदयाचाच एक भाग घेऊन गेलास…. क्लिओ आय मिस यू…” या सगळ्यातून अभिनेत्याच्या मनात असणारी प्राणिमात्रांवरील भावना स्पष्ट होते. तो प्राणी असला तरीही सर्वात आधी तो देखील एक जीव आहे हे विसरून चालणार नाही. हे मुके प्राणी माणसापेक्षा उत्तम असतात, त्यांना जीव लावला तर ते सुद्धा आपल्यावर खूप प्रेम करतात. त्यांच्यातील प्रामाणिकपणा ते नेहमीच मालकासाठी जपून ठेवतात.

अनेक लोक मुक्या प्राण्यावर खूप प्रेम करतात, काहींना त्यांची भरपूर सवय झालेली असते. मात्र काही लोकांना असे प्राणी आवडत नाहीत, त्यांना त्यांची भाषा जाणून घ्यायला आवडत नसते. म्हणून ते लोक या प्राण्यांचा तिरस्कार करतात. पण हे प्राणी जीव लावला तर अगदी आपले बनून राहतात ते ही अखेरच्या क्षणापर्यंत. नक्कीच क्लिओने देखील अक्षयला खूप जीव लावला असणार म्हणून तर अक्षय आपल्या खास मित्राच्या निधनावर इतका भावुक झाला आहे. आमच्याकडून देखील क्लिओला श्रद्धांजली!!