कोट्यावधीची संपत्ती असून देखील एका सामान्य लोकांसारखे अगदी साधे जीवन जगतो ‘धोनी’..जाणून घ्या अधिक..

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीचे नाव अनेक दशके अमर राहणार आहे. धोनीने टी -२० विश्वचषक, २०११ एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ चैंम्पियन ट्रॉफी भारताला मिळवून दिली आहे. धोनीने अलीकडेच वयाची चाळीशी उलटली आहे. जरी आता चाहत्यांना धोनी मैदानावरती दिसत नसला तरी लोकांच्या मनामध्ये धोनीने घर केले आहे.

१९८५ मध्ये झारखंडमध्ये जन्मलेल्या धोनीने २००५ मध्ये पहिला सामना खेळला होता. धोनीने मैदानात जितका शांत दिसतो तसाच तो खऱ्या आयुष्यात हि अगदी सामान्य माणूस जीवन जगत असतो.

स्तविक, वाढदिवसाच्या दिवशी आम्ही त्याचे काही फोटो घेऊन आलो आहोत, हे पाहून तुम्हालाही समजेल की धोनी खरोखरच एक महान व्यक्ती आहे.

धोनीला बाईक्स ची खूप आवड आहे. तो स्वत: बाईक्सची काळजी घेतो. धोनी नेमही आपल्या मनाला वाटेल ते काम करत असतो. मीडिया आणि लोक त्यांच्याबद्दल काय म्हणतील किंवा लोक काय विचार करतील याविषयी तो अजिबात विचार करत नाही.

तथापि, अन्य क्रिकेटपटू महागड्या सलूनमध्ये जात असताना, त्याउलट धोनी फोटोमध्ये एखाद्या सामान्य सलूनमध्ये केस कट करत आहे.

खरं तर धोनी स्वतःही घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो. घरात कोणत्याही दुरुस्तीची किंवा किरकोळ कामांची गरज भासल्यास तो इतर कोणास न सांगता तो स्वतः करायला घेतो.

क्रिकेटपूर्वी माहीला फुटबॉलची आवड होती, तरीही आजही तो आपल्या मित्रांसह फुटबॉल खेळण्याचा आनंद घेत आहे.

धोनीला बाईक आवडत असल्या तरी त्याला सायकलिंगची आवड आहे. खरं तर, माहीच्या मते, प्रत्येक यशस्वी व्यक्तीने आपल्या भूतकाळात नक्कीच कधी तर सायकल चालवलेली असते. लोक पैसे कमावल्यानंतर जिम मध्ये जाऊन सायकल चालवतात, परंतु अशा सायकलिंगला धोनी थर्ड क्लास समजतो.

धोनीचा साधेपणा स्पष्ट या मधून दिसून येतो. धोनीचे अशे अनेक हटके अंदाज आहेत जे इतरांपेक्षा खूप वेगळे आहेत. आणि कदाचित म्हणूनच धोनी हा सर्वांचा आवडता कर्णधार आणि क्रिकेटर आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.