काय सांगता! मॅरेथॉन मध्ये धावून आपलं घर चालवणाऱ्या तीन बहिणींची कहाणी, प्रेरणादायी विशेष.

मित्रहो मेहनत हीच यशाची गुरुकिल्ली आहे, जोवर ती प्राप्त होत नाही तोवर यश मिळवणे कठीण असते. अशीच आपल्या मेहनती मध्ये सातत्य राखणाऱ्या तीन बहिणींची सत्य कहाणी आज आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. यामध्ये शीतल, भाग्यश्री आणि साक्षी या तीन बहिणी आहेत, तिघीही खूप मेहनती, कष्टाळू आहेत. यापैकी सर्वात मोठी आहे ती शीतल, दुसरी आहे ती भाग्यश्री आणि सर्वात लहान आहे ती म्हणजे साक्षी तसेच त्यांना एक लहान भाऊ आणि घरी आई वडील सुद्धा आहेत.

अशा पध्दतीने त्यांच्या घरी एकूण सहा जण सदस्य आहेत, मात्र त्यांचे वडील गेली पंधरा वर्षे अर्धांगवायूच्या आजाराने अंथरुणात आहेत. शीतल बीए च्या शेवटच्या वर्षाला आहे तर भाग्यश्री पहिल्या वर्षाला आहे आणि छोटी साक्षी आता दहावीत आहे. तिघीही बहिणींना परिस्थितीची जान आहे, वडिलांच्या उपचारासाठी आणि घरातील आर्थिक खर्चासाठी गेली सहा वर्षे या तिघी मॅरेथॉन मध्ये धावत आहेत. त्यामध्ये मिळालेल्या पैशातून घरातील समस्या दूर करण्यात येतात.

शीतल,भाग्यश्री आणि साक्षी रोज पहाटे पाच ला उठून ग्राउंड वर प्रॅक्टिस करतात, नंतर घरी येऊन नाष्टा वगैरे करतात आणि मग पुन्हा कुठे काम असेल तर ते दिवसभर पूर्ण करून पुन्हा संध्याकाळी चार वाजता या तिघीही ग्राऊंडला जातात. दरम्यान जे काम केलेले असते त्यांनी त्यामधून सुद्धा त्यांना काही पैसे भेटतात, शिवाय त्यांची आई गावातील ओळखीच्या माणसांच्या वावरात कामाला जाते व पैसे कमावते. हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी, संगोपनासाठी खर्च करते.

शीतल ही तिच्या बहिणींसाठी एक आदर्श आहे आणि आता देशातील सर्व मुलींसाठी सुद्धा ती एक आदर्श आहे. ती सांगते ” जेव्हा मी पहिल्यांदा मॅरेथॉन मध्ये धावले होते तेव्हा मला ५०० रुपये मिळाले होते. त्यानंतर मग मी अजून मोठ्या स्पर्धेत धावू लागले त्यामुळे जास्त पैसे मिळत गेले आणि ते वापरायला मिळाले.”, तसेच भाग्यश्री म्हणते “शेतात काम करून, दिवसभर धावपळ करून आता धावायची सवय लागलीय आणि त्यातूनच आम्ही मॅरेथॉन मध्ये धावून पैसे कमावतो, त्यातून काही पैसे साठवतो जे स्पर्धेसाठी आम्हाला उपयोगी येतात.”

या भंडारी कन्यांना त्यांचे गुरू श्रीरामसेतु आवारी हे प्रशिक्षण देतात, नेहमी त्यांना काही ना काही मदत करतात. त्यांच्या प्रशिक्षणाचा आदर करून या तिघी बहिणी सुसाट वेगाने धावतात आणि आपल्या यशाचे क्षितिज मापतात. त्यांना असेच यश मिळत जावो ही सदिच्छा. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.