अंबानींच्या घरात सुरू होणार लग्नाची धामधूम! करोडपतीच्या मुलीसोबत जुळणार सोयरीक…

उद्योगपती मुकेश अंबानी हे आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. नुकतीच त्यांच्या घरात लग्नाची लगबग सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे. मुकेश अंबानी यांचा नातू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नुकताच त्याचा साखरपुडा पार पडलेला पाहायला मिळाला. मुकेश अंबानी यांचा हा नातू मात्र आकाश अंबानी यांचा मुलगा पृथ्वी अंबानीचं नाही. तर ते लग्न आहे त्यांच्या दुसऱ्या एका नातवाचं.

निखिल मेसवानी हा मुकेश अंबानी यांचा पुतण्या आहे. निखिल मेसवानी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. निखिल यांचा मुलगा ईशान मेसवानीचं लवकरच लग्न होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या नात्याने ईशान मुकेश अंबानी यांचा नातू आहे. त्यामुळे आता लवकरच अंबानींच्या घरात सनई चौघडे वाजणार असल्याचे बोलले जात आहे. ईशानच्या आईचे नाव एलिना मेसवानी आहे.

रिअल इस्टेट टायकून संदीप रहेजा यांची मुलगी गायत्री रहेजा बरोबर ईशान मेसवानीचं लग्न होणार आहे. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी लॉस अँजेलिस मध्ये एका खासगी कार्यक्रमात या दोघांचा साखरपुडा पार पडला. गायत्री आणि ईशान लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. आता ही मैत्री नात्यात बदलणार आहे. या साखरपुडा समारंभाला केवळ काही जवळची मंडळी उपस्थित होती, असे सांगण्यात येते. गायत्रीच्या आईचं नाव दुर्गा रहेजा आहे.

केवळ कुटुंबियांनीच या समारंभाला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. या सोहळ्याला मेसवानी आणि रहेजा कुटुंबाव्यतिरिक्त नीता अंबानी आणि त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी देखील हजेरी लावलेली पाहायला मिळाली. सध्या ईशानचा अंगठी घातलेला एक फोटो सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. आता लवकरच गायत्री आणि ईशानचे लग्न होईल असा अंदाज बांधला जात आहे.

अंबानी कुटुंबातील लग्न म्हणजे एखाद्या राजेशाही लग्नाचा थाट. त्यामुळे या लग्नाची तारीख जाणून घेण्यासाठी सामान्य माणसांप्रमाणेच मीडिया देखील प्रचंड उत्सुक आहे. अंबानी कुटुंबात एखादा लग्नसोहळा पार पडल्यानंतर अनेक दिवस त्या समारंभाची चर्चा माध्यमांमधून होत असते. आता ईशान आणि गायत्रीच्या लग्नाची चर्चा देखील अशीच रंगणार आहे.

जगभरातील अशाच काही सेलिब्रेटीजच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. त्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना जरूर फॉलो करा. तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.