‘या’ अभिनेत्रीने घेतलं रजनीकांतच्या शेजारी घर! कोट्यवधींचं घर खरेदी केलं या ठिकाणी…

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे नयनतारा. १८ नोव्हेंबर १९८४ रोजी नयनताराचा जन्म कर्नाटक मधील बंगलोर येथे झाला. या अभिनेत्रीने आतापर्यंत तमिळ, तेलगू आणि मल्याळम अशा भाषांमध्ये मिळून जवळपास ७५ चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या अभिनयाने ती नेहमीच चर्चेत असते. आता ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने आपले स्वप्नातले घर खरेदी केले. या घरामुळे नयनतारा बद्दल चर्चा होताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

मीडिया रिपोर्टनुसार, नयनताराने हल्लीच तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथील पोएस गार्डनमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. या घराचे वैशिष्ट्य हे आहे, की हे घर सुपरस्टार रजनीकांतच्या घराशेजारीच आहे. याशिवाय रजनीकांत यांचा जावई अभिनेता धनुष देखील तिथेच राहतो. एखादा चांगला मुहूर्त पाहून नयनतारा आपल्या या नव्या घरात गृहप्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

नयनतारा लवकरच तिचा बॉयफ्रेंड शिवन सोबत लग्न करणार असल्याच्याही बातम्या येत आहेत. २०१५ मध्ये एका चित्रपटादरम्यान काम करताना दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. सध्या दोघेही आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. नयनतारा आणि शिवन सोशल मीडिया वर उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली देताना दिसतात. या दोघांच्या अलीकडच्या काही पोस्ट्स वरून दोघेही लग्नबंधनात अडकणार असं दिसतंय. मात्र दोघांकडूनही अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य जाहीर करण्यात आलेले नाही. नयनताराचे चाहते दोघांच्या लग्नाच्या तारखेची वाट बघत आहेत.

कॉलेजमध्ये शिकत असताना नयनतारा मॉडेल म्हणून काम करायची. २००३ मध्ये एका दिग्दर्शकाने तिला पाहिले आणि त्याच्या चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली. ‘मनस्सीनक्करे’ या चित्रपटाद्वारे नयनताराने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तिला चित्रपटात काम करण्यात रस नव्हता. मात्र तिचा पहिलाच चित्रपट प्रचंड यशस्वी ठरल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करणे सुरू केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by nayanthara🔵 (@nayantharaaa)

सध्या नयनतारा ‘अन्नाथे’ या चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे. रजनीकांतची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटातील नयनताराच्या भूमिकेचेही बरेच कौतुक होताना दिसत आहे. याशिवाय नयनतारा सध्या चिरंजीवीच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे नाव ‘कथु वाकुला रेन्दू कादल’ आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नयनताराचा बॉयफ्रेंड शिवन करत आहे. लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल. तिचे चाहते अर्थातच हा चित्रपटही डोक्यावर घेतील, यात शंका नाही.