दाक्षिणात्य अभिनेत्रींचे अभिजात सौंदर्य! या अभिनेत्री दिसतात मेकअप शिवाय देखील सुंदर…

चित्रपट अभिनेत्रींचा विषय निघाला की त्यांच्या सौंदर्याची चर्चा तर हमखास होतेच. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही लोक चाहते असतात. मात्र आपल्याला या अभिनेत्रींचे पडद्यावर दिसणारे सौंदर्य हे बहुतेक वेळा त्यांच्या मेकअपमुळे असते. त्यामुळे या अभिनेत्री मेकअप शिवाय कशा दिसतात, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांनाच असते. चला तर पाहूया अशाच काही दाक्षिणात्य अभिनेत्रींचा विना-मेकअप लूक…

रश्मिका मंदाना: नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. बऱ्याच वेळा ती सोशल मीडिया वर आपला नो-मेकअप लूक शेअर करताना दिसते.

समंथा रूथ प्रभू: सध्या नागा चैतन्य सोबत झालेल्या घटस्फोटामुळे गेल्या काही दिवसांपासून समंथा चर्चेत आहे. नुकतेच तिने ‘पुष्पा’ चित्रपटात एक आयटम सॉंग देखील केले आहे. तिचे हे पहिलेच आयटम सॉंग आहे.

अनुष्का शेट्टी: ‘बाहुबली’ मधील देवसेना तिच्या कॉस्च्युम आणि मेकअपमुळे खूपच सुंदर दिसली आहे. देवसेनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री अनुष्का शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

काजल अग्रवाल: अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री काजल अग्रवाल बॉलिवूड मध्ये तिच्या ‘सिंघम’ चित्रपटातील कामासाठी ओळखली जाते. २०२० मध्ये तिने बिझनेसमॅन गौतम किचलू सोबत लग्न केले.

तमन्ना भाटिया: दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूड मध्येही नाव कमावणारी अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. ‘बाहुबली’ चित्रपटामुळे तिच्या लोकप्रियतेत अजूनच भर पडली. तमन्नाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आपला असा वेगळा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

नयनतारा: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतलं अजून एक गाजलेलं नाव म्हणजे अभिनेत्री नयनतारा. मात्र आपल्या कामापेक्षा ती अभिनेता प्रभूदेवा सोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे जास्त चर्चेत राहिली.

इलियाना डिक्रूज: आपल्या गोड हास्याने आणि उत्तम अभिनयाने इलियानाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

स्नेहा उल्लाल: ऐश्वर्या रायची कॉपी म्हणून ओळखली जाणारी स्नेहा बॉलिवूडमध्ये फारसे यश मिळवू शकली नाही. मात्र तिने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये बरेच काम केले आहे.

प्रिया प्रकाश वारियर: आपल्या ठसकेबाज अदांनी तरुणाईला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया प्रकाश वारियर. मेकअप शिवाय ती फारच वेगळी दिसते.

त्रिशा कृष्णन: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूड अशा दोन्ही ठिकाणी त्रिशाने यश मिळवलं आहे.

श्रिया सरन: ‘शिवाजी द बॉस’ सारख्या चित्रपटांमुळे प्रसिद्धीझोतात आलेली श्रिया दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक गाजलेलं नाव आहे.

नमिता: नमिताने २०१७ मध्ये वीरेंद्र चौधरी बरोबर लग्नगाठ बांधली.