छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींच्या या आहेत काही वाईट तर काही अतरंगी सवयी!

कामाचा ताण कमी करण्यासाठी व्यसनाच्या आहारी जाणं हा काही पर्याय नाहीये. मात्र छोट्या पडद्यावरील काही अभिनेत्रींना अशा काही वाईट सवयी आहेत आणि त्या काही त्यांना सुटता सुटत नाहीयेत. बऱ्याच अभिनेत्रींना धूम्रपान आणि मद्यपानाची सवय लागलेली असली, तरी काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांना काहीतरी भलत्याच सवयी आहेत.

सुरभी चांदना
‘नागीन’ मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेल्या सुरभी चांदनाला सिगरेट पिण्याची सवय आहे. कितीही प्रयत्न केले तरी तिची ही सवय सुटत नाहीये.

करिष्मा तन्ना
करिष्माने देखील आपली स्मोकिंगची सवय सोडण्याचा खूप प्रयत्न केला आहे, मात्र तिला यात काही यश मिळालेले दिसत नाही.

निया शर्मा
हॉट सेलिब्रेटी निया दारूच्या आहारी गेलेली दिसून येते. प्रत्येक पार्टीत ती हटकून दारू पिताना दिसते.

दिव्यांका त्रिपाठी
बऱ्याच अभिनेत्री धूम्रपान आणि मद्यपानाच्या आहारी गेलेल्या असताना दिव्यांकाला मात्र ओसीडी (Obsessive Compulsive Disorder) चा सामना करावा लागतोय. तिला स्वच्छतेची अति आवड असून आपले घर ती नेहमी स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करते. तिला एखाद्या गोष्टीवर धूळ बसलेली किंवा वस्तूंच्या जागा बदललेल्या चालत नाहीत.

टीना दत्ता
‘उतरन’ मालिकेमधील इच्छा म्हणजेच टीना दत्ता देखील स्मोकिंगच्या आहारी गेलेली पाहायला मिळते.

सारा खान
सारा चेन स्मोकर आहे. प्रत्येक पार्टीत तिला स्मोकिंग करताना बघितलं गेलं आहे.

द्रष्टी धामी
द्रष्टी धामीला स्ट्रेस मध्ये असल्यावर नखं चावायची सवय आहे.

सुमोना चक्रवर्ती
‘द कपिल शर्मा शो’ मधून प्रसिद्धी मिळालेली सुमोना देखील चेन स्मोकर आहे.

श्रीजिता डे
श्रीजिता एक दिवस देखील स्मोकिंग केल्याशिवाय राहू शकत नाही.

श्वेता बासू प्रसाद
श्वेताला देखील धूम्रपानाची प्रचंड सवय आहे.

सोनाली राऊत
२०१० मध्ये ‘किंगफिशर कॅलेंडर गर्ल’ म्हणून आणि नंतर ‘बिग बॉस’ मधून प्रसिद्ध झालेली सोनाली सिगारेट शिवाय राहू शकत नाही.

कश्मिरा शाह
कश्मिराल देखील स्मोकिंगची सवय आहे.

अचिंत कौर
छोट्या पडद्यावरील प्रचंड गाजलेलं नाव म्हणजे अचिंत कौर. अचिंतला दारूचे व्यसन आहे.

हिना खान
त्यामानाने हिना खानची सवय काही अंशी चांगली आहे असे म्हणावे लागेल. हिनाला सतत हात धुवायची सवय आहे. ती नेहमी सॅनिटायझर जवळ बाळगते. इतर वेळीही ती सतत सॅनिटायझरने किंवा साबणाने हात स्वच्छ करताना दिसून येते. कोरोना काळात ही सवय चांगलीच आहे असं म्हणायला हरकत नाही.