चित्रपट सृष्टीतील या जोड्यांचे घटस्फोट बनले होते सोशल मीडियावरती चर्चेचे कारण..

मित्रहो जोडी बनवणे आणि तोडणे हे पूर्णपणे नियतीच्या हातात असते, ती आपली जोडी कोणाशी ठरवते त्याच्यासोबतच आपली गाठ बांधली जाते. अनेकांचे प्रेमविवाह होतात, काहीजण घरच्यांनी ठरवलेल्या स्थळाला पसंत करतात. मात्र हे नाते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत टिकून राहील याची काही शाश्वती नसते. खूपदा घटस्फोट सुद्धा होतात, सोशल मीडियावर अनेकदा घटस्फोटाच्या बातम्या समोर येतात. खास करून बॉलिवूड, मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यातील असे किस्से समोर येतात.

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत काही जोड्या अचानक घटस्फोट घेऊन वेगळ्या झाल्या आहेत ज्या खूप प्रसिद्ध असूनही त्यांच्या घटस्फोटाचे कारण मात्र कोणाला कळून आले न्हवते. त्यातील एक जोडी आहे, शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची आहे. या दोघांची जोडी “होणार सून मी या घरची” या मालिकेच्या सुरुवातीलाच रसिकांच्या मनात भरली होती. अनेकांनी या जोडीला विशेष लोकप्रियता दिली होती. शशांक आणि तेजश्री या दोघांनी याच दरम्यान आपली लग्नगाठ बांधली पण पुढे वर्षभरात त्यांच्यात खटके उडायला। सुरुवात झाली आणि मग त्यांनी घटस्फोट घेतला.

तसेच अभिनेता विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण यांचा घटस्फोट सुद्धा चाहत्यांसाठी धक्कादायकच होता. यावेळी स्नेहा चव्हाणने अनिकेतच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तिने तिच्यावर अनिकेतने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण समोर येताच अनेक चाहते आश्चर्य चकित झाले होते. २०१८ मध्ये या दोघांनी लग्न केले होते, मात्र फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा माहेरी निघून गेली.

तसेच मराठी चित्रपट सृष्टीची डेरिंगबाज अभिनेत्री सई ताम्हणकर हीने अमेय गोसावी सोबत आपली लग्नगाठ बांधली होती. या दोघांचे लग्न १५ जुलै २०३१ मध्ये झाले होते, मात्र खूप कमी लोकांना त्यांच्या लग्नाबद्दल माहिती आहे. अमेय हा एक प्रोड्युसर आहे,शिवाय त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. या दोघांनी लव्हमेरेज केली होती, अगदी तीन वर्षांच्या अफेअर नंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ते दोघेही एकाच क्षेत्रात असूनही कधीच एकत्र काम करताना दिसले न्हवते. पण लग्नानंतर अचानक त्यांनी घटस्फोट घेऊन चाहत्यांना धक्का दिला.

चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आणि अपर्णा यांचा घटस्फोट सुद्धा अनेकांना थक्क करणारा होता, स्वप्नील जोशीचे पाहिले मग्न अपर्णा सोबत झाले होते मात्र लग्नाच्या केवळ ४ वर्षानंतर ते विलग झाले व त्यांनी घटस्फोट घेतला. तसेच पल्लवी पाटील आणि संग्राम समेळ यांचा घटस्फोट देखील चाहत्यांना धक्का देणारा होता. संग्रामने अचानक श्रद्धा पाठक सोबत लग्नाचे काही फोटो अचानक सोशल मीडियावर शेअर करून धक्काच दिला. कारण त्याचे पल्लवी सोबत लग्न झाले आहे हे अनेकांना माहीत होते.

तसेच रेशम टिपणीस आणि संजीव सेठ यांनी लग्न केले होते, लग्नावेळी रेशम २० वर्षाची तर संजीव ३२ वर्षाचे होते. लग्नानंतर अवघ्या वर्षभरात रेशमने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र काही वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि चाहत्यांना धक्काच दिला. या सर्व जोड्यांचा अचानक झालेला घटस्फोट सोशल मीडियावर आजही चर्चेत असतोच. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.