या बॉलिवूड कलाकारांची सुरू आहे घरच्या घरी शेती! टोमॅटो, कोथिंबीर आणि बरंच काही…

बॉलिवूड कलाकार म्हटलं, की त्यांची श्रीमंत जीवनशैली डोळ्यांसमोर येते. मात्र काही कलाकार असे आहेत, जे खूप साधे राहणीमान पसंत करतात. त्यामुळे आता हे कलाकार चक्क घरच्या घरीच शेती करू लागले आहेत.

धर्मेंद्र: ‘शोले’ चित्रपटातले सगळ्यांचे लाडके वीरू पाजी म्हणजेच अभिनेते धर्मेंद्र. धर्मेंद्र यांची स्वतःची शेती असून ते स्वतःदेखील शेतात काम करताना दिसतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

आर माधवन: अभिनेता आर माधवनने एका नापीक जमिनीला सुपीक बनवत त्यावर नारळाची बाग फुलवली आहे. ही जमीन कसायला त्याला पाच वर्षं वाट पहावी लागली. मात्र त्याच्या या कष्टाचे फळ त्याला खूप उत्तम पद्धतीने मिळालेले दिसत आहे. शेतीच्या आधुनिक पद्धती, ऑरगॅनिक पद्धती आजमावत आज आर माधवनने आपले हे सुंदर फार्म बनवले आहे.

प्रीती झिंटा: डिंपल गर्ल प्रीती झिंटा खूप आधीपासून घरच्या घरी आपल्या भाज्या उगवत आहे. आता आपल्या जुळ्या मुलांसाठी तिने आपल्या या घरच्या शेतात फळझाडेही लावायला सुरुवात केली आहे. त्याचा व्हिडिओ देखील तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून शेअर केला होता.

जॅकी श्रॉफ: अभिनेते जॅकी श्रॉफ नेहमी सगळ्यांना झाडं लावण्याचा सल्ला देतात. मात्र ते केवळ सल्ला देऊन थांबत नाहीत, तर स्वतः तो अंमलात देखील आणतात. या शिवाय गेली अनेक वर्षं ते स्वतः शेतीदेखील करत आहेत. मुंबई आणि पुण्याच्या दरम्यान त्यांचं ४४ हजार स्क्वेअर फूटचं फार्महाऊस आहे जिथे ते अनेक भाज्या पिकवतात.

जुही चावला: जुही चावलाला देखील शेती करणे पसंत आहे. ती केवळ शेती करत नाही, तर शेतकरी आंदोलनाला तिने पाठींबाही दिलेला पाहायला मिळतो. आपल्या घरच्या शेतीचे फोटो ती अनेकदा सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Juhi Chawla (@iamjuhichawla)

सलमान खान: सलमान खान स्वतः शेती करतो आणि तो दुसऱ्यांनाही शेती करण्याचा सल्ला देतो. आपल्या पनवेलच्या फार्महाऊस वर तो अनेक भाज्यांचे पीक घेतो. त्याचं म्हणणं आहे, की शेती करताना त्याला स्वतःचा फिटनेस सांभाळायची संधी मिळते.

शिल्पा शेट्टी: योगा सेलिब्रेटी शिल्पा शेट्टीच्या फिटनेसमागे आणखी एक कारण आहे आणि ते म्हणजे शेती. ती देखील शेती करते. आपल्या घरीच ती वेगवेगळ्या भाज्या पिकवताना दिसते. आपल्या मुलांना ती आतापासूनच ऑरगॅनिक फूडचे महत्त्व पटवून देताना दिसत आहे. तिचा मुलगा विहान तिला शेतीत मदत करतो.