या बॉलिवूड स्टार्सनी केली होती सुंदर दिसण्यासाठी सर्जरी! या लिस्टमध्ये आहे सर्वप्रथम सलमान खान मग…

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार कार्यरत आहेत, त्यांच्या लुकवर आपण नेहमीच फिदा असतो. आपल्याला ते सगळे खूप सुंदर दिसतात, त्यांच्या सौंदर्याचे गुपित जाणून घेण्यासाठी आपण खूप उत्सुक असतो. पण त्यांनी आपले सौंदर्य वाढवण्यासाठी काही वेळा सर्जरी सुद्धा केलेली असते ज्यामुळे ते अधिक सुंदर दिसतात. आज आपण अशाच काही बॉलिवूड स्टार्स बद्दल जाणून घेऊया ज्यांनी आपले सौंदर्य वाढवण्यासाठी सर्जरी केली आहे.

यामध्ये आपण पाहीले तर बॉलिवूड अभिनेता सलमान खान देखील येतो, सलमान हा अनेकांचा लाडका अभिनेता आहे. त्याच्या अनेक चित्रपटात त्याच्या लुक वर अनेकजण भलतेच फिदा आहेत. पण २००३ च्या दरम्यान सलमानला केसगळतीचा त्रास सुरू झाला होता. त्यावेळी त्याने भारतातच हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी करून घेतली होती. पण ती यशस्वी झाली नाही मग पुढे त्याने २००७ साली दुबई इथून पुन्हा सर्जरी करून घेतली.

बॉलिवूडची सुंदरी म्हणली जाणारी अभिनेत्री म्हणजे करीना कपूर, ग्लॅमरसच्या या दुनियेत तिची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तिने आपल्या सौंदर्याला वाढवण्यासाठी आपल्या नाकाची सर्जरी केली आहे, ज्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. आपण तिचा सर्जरी पूर्वीचा फोटो आणि सर्जरी नंतरचा फोटो पाहिला तर आपल्याला तिच्या सौंदर्यातील फरक लक्षात येईल. या सर्जरी मुळे ती खूप छान दिसते.

तसेच यामध्ये प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान यांचीही गणती होते, सैफ यांचे वय आता ५१ आहे. त्यामुळे वाढत्या वयासोबत त्यांच्यात म्हातारपणाची लक्षणे दिसून येत आहेत. पण ते लपविण्यासाठी सैफ नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च केले आहेत. कित्येकदा सैफने बोटॉक्स सर्जरी देखील केली आहे. सैफ यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे, त्यांचे अनेकजण चाहते आहेत. तसेच सोशल मीडियावर सुद्धा ते नेहमी चर्चेत असतात.

तसेच बॉलिवूडची सर्वात लाडकी अभिनेत्री म्हणजे आलिया भट, हीने आपल्या निरागस सौंदर्यातून भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. तिच्या सौंदर्याला नैसर्गिक पणा लाभला आहे अशी अनेकांची समजूत आहे, पण फार कमी लोकांना तिच्या सर्जरी बद्दल माहिती आहे. रिपोर्ट्सनुसार आलियाने आपल्या लिप्स ची तसेच चेहऱ्याची आणि नाकाची सुद्धा सर्जरी केली आहे. तिचा पहिला चित्रपट स्टुडंट ऑफ द इयर मध्ये तिने आपल्या चेहऱ्यावर खूप खर्चा केला होता.

बॉलिवूडच्या चांदणीची मुलगी, म्हणजेच श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर ही देखील हल्ली भलतीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय झालेली पाहायला मिळते. तिने देखील आपल्या आईप्रमाणे प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने बॉलिवूड मध्ये येण्यापूर्वी आपल्या नाकाची सर्जरी केली होती. तसेच तिने लिप्स सर्जरी देखील केली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीन भर पडली आहे. तिचे खूपसे चित्रपट आपल्या भेटीस आले आहेत.

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सुद्धा यांमध्ये गणला जातो, रणबीरने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याच्या निरागस चेहऱ्यावर अनेकजण फिदा असतात. पण २००७ मध्ये आलेल्या “अजब प्रेम की गजब कहाणी” या चित्रपटदरम्यात रणबीरला डोक्याला टक्कल पडल्याचे दिसून येते. त्यानंतर त्याने हेअर ट्रान्सप्लांट करून घेतले आहे.

अभिनेता शाहिद कपूर सुद्धा अनेकांना आवडतो, त्याने देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण करण्याआधी आपल्या नाकाची सर्जरी करून घेतली होती. आपल्या नाकाच्या आकारामुळे तो मोठ्या प्रमाणात तणावात होता, त्यानंतर त्याने राहिनोप्लॅस्टि सर्जरीच्या साहाय्याने आपल्या नाकाचा आकार बदलून घेतला आहे. त्यामुळे त्याची सुंदरता आणखीन वाढली आहे. त्याचे अनेक लोक चाहते बनले आहेत.

बॉलिवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर हीने अनेकांची मने जिंकली आहेत. तिच्या निरागस अभिनयावर अनेकजण फिदा आहेत, तसेच तिच्या सौंदर्यावर देखील अनेक लोक छान कमेंट करत असतात. पण ती हल्ली पडद्यावर झाली असून बॉलिवूड मध्ये पुन्हा येण्यासाठी तिने दोनदा प्रयत्न केला. आणखीन सुंदर दिसण्यासाठी तिने देखील सर्जरीची मदत घेतली आहे. तिने कॉस्मोटिक सर्जरी केली आहे.

दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील गाजलेली अभिनेत्री श्रुती हसन नेहमीच चर्चेत असते, अनेक लोक तिचे प्रचंड चाहते आहेत. पण तिने सुद्धा चित्रपट सृष्टीत येण्याआधी आपल्या चेहऱ्याची सर्जरी केली होती. रिपोर्ट्सनुसार तिने आपल्या नाकाची आणि ओठांची सर्जरी केली आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे तिला तिच्या करिअर मध्ये देखील खूप फायदा झाला आहे.

या सर्व कलाकारांनी आपले सौंदर्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी सर्जरी करून घेतली आहे. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.