या टीव्ही स्टार्सनी केली आहेत दोन लग्नं! या आहेत त्या अभिनेत्री…

बऱ्याचदा हिंदी चित्रपटसृष्टीतील ब्रेकअप आणि पॅचअपची चर्चा होत असते. मात्र अशाच काही गोष्टी छोट्या पडद्यावरील कलाकारांच्या बाबतीत पण घडताना दिसतात. हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्री मधील काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी दोन वेळा लग्न केले आहे. दुर्दैवाने यातील बऱ्याच अभिनेत्रींना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. मात्र यापैकी बऱ्याच अभिनेत्री आपल्या दुसऱ्या लग्नानंतर सुखात असल्याचे चित्र आहे.

दीपशिखा नागपाल
जीत उपेंद्र बरोबरचा संसार मोडल्यानंतर दीपशिखाने केशव बरोबर लग्न केले.

श्वेता तिवारी
अभिनेता राजा चौधरी बरोबर ९ वर्षं संसार केल्यावर श्वेता तिवारीने त्याच्यावर घरगुती हिंसाचाराचा आ’रोप लावत घट’स्फो’ट घेतला. त्यानंतर तिने अभिनेता अभिनव कोहली बरोबर लग्न केले.

अर्चना पुरणसिंग
पहिले लग्न अयशस्वी ठरल्यानंतर अर्चना ५ वर्षं परमित सेठी बरोबर लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये होती. मग दोघांनी गुपचूप लग्न उरकून घेतले.

तनाझ इराणी
फरीद करीम बरोबरचे नाते संपल्यानंतर तनाझने २००७ मध्ये बख्तियार बरोबर दुसरे लग्न केले.

श्रद्धा निगम
अभिनेता करण सिंग ग्रोव्हर बरोबरचा श्रद्धा निगमचा संसार अवघ्या एका वर्षात संपुष्टात आला. २०१२ मध्ये तिने अभिनेता मयंक आनंद बरोबर दुसरे लग्न केले.

डिम्पी गांगुली
२०१० मध्ये टीव्ही वरील स्वयंवरातून राहुल महाजन आणि डिम्पी गांगुलीचे लग्न झाले. मात्र घरगुती हिंसाचाराचे आरोप लावत २०१४ मध्ये डिम्पी राहुलपासून वेगळी झाली. त्यानंतर तिने रोहित रॉय बरोबर आपला नवा संसार थाटला.

ऋचा गुजराती
ऋचा गुजरातीने बिझनेसमॅन मितुल संघवी बरोबर ३ वर्षं संसार केला. मितुल तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागल्याने ती त्याच्यापासून वेगळी झाली. पुढे तिने विशाल जयस्वाल बरोबर लग्नगाठ बांधली.

गौतमी कपूर
कमर्शियल फोटोग्राफर मधुर श्रॉफ बरोबरचे लग्न संपुष्टात आल्यावर गौतमीने २००३ मध्ये राम कपूर बरोबर नव्या संसाराला सुरुवात केली.

रेणुका शहाणे
रेणुका यांनी पहिले लग्न लेखक-दिग्दर्शक विजय केंकरे यांच्याबरोबर केले होते. मात्र घट’स्फो’ट घेऊन त्या वेगळ्या झाल्या आणि नंतर त्यांनी अभिनेता आशुतोष राणा बरोबर लग्नगाठ बांधली.

चाहत खन्ना
२००६ मध्ये चाहत खन्ना आणि बिझनेसमॅन भरत नरसिंहानी यांनी लग्न केले. मात्र हे लग्न केवळ ७ महिनेच टिकलं. भरतच्या मानसिक छळाला कंटाळून तिने घट’स्फो’ट घेतला. पुढे तिने दुसरे लग्न केले.