केवळ मेकअपमुळे हँडसम दिसतात हे ५ अभिनेते! खरे चेहरे पाहून धक्का बसेल…

बॉलिवूड अभिनेत्यांवर तर आख्खं जग फिदा आहे. त्यांच्या हँडसम चेहऱ्यांवर दुनिया अगदी जीव देखील ओवाळून टाकेल. काही बॉलिवूड अभिनेते तर असे आहेत, जे गेली अनेक वर्षं तितकेच हँडसम दिसत आहेत. वय वाढलं तरी हे अभिनेते अजूनही कसे बरं तरुण दिसत असतील? वर्षानुवर्षे त्यांचा चेहरा तसाच कसा काय असतो बुवा? असे प्रश्न पडणं साहजिक आहे. मात्र यामागचे कारण आहे मेकअप. हे अभिनेते केवळ मेकअपमुळे इतके तरुण आणि हँडसम दिसतात. चला तर पाहूया या ५ अभिनेत्यांचे खरे चेहरे, जे केवळ मेकअपमुळे हँडसम दिसतात.

अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी कुमार आपल्या चित्रपटांमध्ये नेहमीच काहीतरी वेगळे करताना दिसतो. गेली अनेक वर्षे तो चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. तो नेहमीच आपल्या चित्रपटांमध्ये हँडसम दिसतो. मात्र खऱ्या आयुष्यात तो आता म्हातारा दिसू लागला आहे. केवळ मेकअपमुळे तो पडद्यावर इतका हँडसम दिसतो.

अजय देवगण
१९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ चित्रपटातून चंदेरी पडद्यावर पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे अजय देवगण. अजय देवगणने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अलीकडे त्याचे वय पडद्यावर दिसू लागले असले तरी तो पडद्यावर अजूनही हँडसम दिसतो. मात्र ही केवळ मेकअपची कमाल आहे.

सलमान खान
भाईजान सलमान खानच्या हँडसम असण्यावर तर सगळ्याच मुली फिदा आहेत. ‘मैंने प्यार किया’ सारख्या चित्रपटांमधून त्याची लोकप्रियता वाढली. सलमाननेही आपल्या नावावर अनेक हिट चित्रपटांची मालिका दिली आहे. मात्र त्याचा हा हँडसमनेस केवळ मेकअपमुळे आहे.

शाहरुख खान
कधी काळी बॉलिवूडचा चॉकलेट हिरो म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख खान आता वयाची पन्नाशी उलटून गेली तरी हँडसम दिसतो. ही सगळी मेकअपची कमाल आहे.

रजनीकांत
केवळ आपल्या नावावर चित्रपट हिट बनवणाऱ्या अभिनेत्यांमध्ये सगळ्यांत आधी नाव घेतलं जातं ते सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचं. वयाची सत्तरी उलटून गेल्यानंतरही रजनीकांत पडद्यावर आजही तितकेच तरुण आणि हँडसम दिसतात. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात मात्र आता त्यांचं वय दिसू लागलं आहे. केवळ मेकअपमुळे ते पडद्यावर तरुण आणि हँडसम दिसतात.

काय मग मंडळी, या अभिनेत्यांचे खऱ्या आयुष्यातले फोटो पाहून धक्का बसला ना? मेकअपची कमालच अशी आहे! त्यामुळे आता हे अभिनेते पडद्यावर कितीही हँडसम दिसले, तरी त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. मात्र त्याचवेळी त्यांच्या अभिनयाचं कौतुक करायलाही विसरू नका.