शाळेची फी भरू न शकणाऱ्या मुलांना दाक्षिणात्य अभिनेता विजय देणार मोफत शिक्षण!

दाक्षिणात्य सुपरस्टार थालापति विजय आपल्या चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यात विजयचा हातखंडा आहे. मात्र याव्यतिरिक्त तो आपल्या सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याने अनेक सामाजिक कार्यांमध्ये भाग घेत समाजातील अनेक घटकांना मदत केली आहे. त्याचे वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमीच चर्चेत असतात. अशातच त्याच्या अजून एका सामाजिक उपक्रमाची चर्चा होताना दिसत आहे.

सध्या त्याने गरजू मुलांच्या शिक्षणासाठी हात पुढे केला आहे. विजयला लहान मुलं खूप आवडतात. सध्या तो गरीब मुलांसाठी शाळा उभारत आहे. याची अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी ती लवकरच होईल अशी आशा आहे. या शाळेद्वारे गरजू मुलांना शिक्षण दिले जाणार आहे. ज्या मुलांना शिकायची इच्छा आहे, मात्र आर्थिक अडचणींमुळे ज्यांना शिकता येत नाही अशा मुलांना या शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेता येणार आहे. चेन्नईच्या थिरुपुरूर मध्ये ही शाळा बांधण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या अभिनेता विजय आपल्या फॅन क्लबस् च्या माध्यमातून तामिळनाडूतील अनेक केंद्रांमध्ये मोफत रेस्टॉरंट चालवत आहे. या ठिकाणी गरजू भुकेल्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जाते.

थालापति विजयच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले, तर तो ‘बिस्ट’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपले असून चित्रपट आता निर्मितीच्या पुढच्या टप्प्यावर पोचला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नेल्सन दिलीपकुमार यांनी केले आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची प्रेक्षक खूप आतुरतेने वाट पहात आहेत. या बरोबरच विजयने त्याच्या अजून एका आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. सध्या या चित्रपटाला ‘थालापति ६६’ असे नाव देण्यात आले आहे. वाश्मी पैदिपल्ली हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

विजयने शेवटचा चित्रपट ‘मास्टर’ केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसला. हा एक ऍक्शन आणि ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात तो विजय सेतुपति सोबत दिसला होता. या दोघांना एकत्र एका स्क्रीन वर पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांनी जितका चांगला प्रतिसाद दिला होता, तेवढेच चांगले बॉक्स ऑफिस कलेक्शन या चित्रपटाने जमवले होते.

तुमच्या आवडत्या कलाकारांच्या बाबतीतले असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया पेजेसना फॉलो करा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.