अक्षय कुमारची ही अभिनेत्री पूर्वीपेक्षाही आता दिसते सुंदर आणि बोल्ड! दोन वर्षांपूर्वी झाली सिनेसृष्टीपासून दूर…

२००२ मध्ये अक्षय कुमारचा ‘आवारा पागल दिवाना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये त्याच्याबरोबर एक अभिनेत्री झळकली होती. ती होती आरती छाब्रिया. आरती सध्या ३९ वर्षांची आहे. गेली दोन वर्षे ती सिनेसृष्टीपासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडिया वर सतत सक्रीय असते. ती सोशल मीडिया वर आपले नवनवीन फोटो अपलोड करते. यामध्ये दिसून येते की आरती आधीपेक्षाही आता खूप सुंदर दिसत आहे.

आरतीने हिंदी, तेलगू, पंजाबी आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने आजपर्यंत मॅगी नूडल्स, पेप्सोडेन्ट टूथपेस्ट, क्लिन अँड क्लिअर फेसवॉश, अमूल फ्रॉस्टीक आईस्क्रीम, क्रॅक क्रीम, कल्याण ज्वेलर्स अशा तब्बल ३०० जाहिरातींमध्ये काम केले आहे.

१९९९ मध्ये तिने ‘मिस इंडिया वर्ल्डवाईड’ चा किताब जिंकला. त्यानंतर तिने सुखविंदर सिंगच्या ‘नशा ही नशा है’, अवधूत गुप्तेच्या ‘मेरी मधुबाला’, अदनान सामीच्या ‘रुठे हुए हो क्या’ अशा म्युझिक व्हिडिओ मध्ये काम केले. २००२ मध्ये तिने ‘तुमसे अच्छा कौन है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या आधी तिने २००० मध्ये ‘मधुर क्षणम’ या चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.

२०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘दस तोला’ हा चित्रपट तिचा अखेरचा बॉलिवूडपट ठरला. २०११ मध्ये तिने ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी’ हा रिऍलिटी शो जिंकला. २०१७ मध्ये तिने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत ‘मुंबई वाराणसी एक्सप्रेस’ या लघुपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले. या शॉर्ट फिल्मला खूप सारे पुरस्कार मिळाले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarti Chabria (@aartichabria)

आरतीने तसे बरेच चित्रपट केले आहेत. मात्र चित्रपटसृष्टीत तिला हवे तसे यश मिळालेले नाही. तिने राजा भैया (२००३), अब तुम्हारे हवाले वतन साथियो (२००४), शादी नं. १ (२००५), सुख (२००५), तीसरी आँख: द हिडन कॅमेरा (२००६), शूटआऊट ऍट लोखंडवाला (२००७), पार्टनर (२००७), डॅडी कूल (२००९), किससे प्यार करू (२००९), मिलेंगे मिलेंगे (२०१०) अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aarti Chabria (@aartichabria)

सिनेसृष्टीत मनासारखे काम मिळत नसल्याने तिने दोन वर्षांपूर्वी ११ मार्च २०१९ रोजी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या विशारद बदेसी सोबत लग्नगाठ बांधली. २३ जून २०१९ रोजी ती परदेशात स्थायिक झाली. मॉरिशस आणि ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त ती अधून मधून मुंबईलाही येत असते.