‘ही’ अभिनेत्री तब्बल 40 व्या वर्षी होणार आई, म्हणाली…

बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री किश्वर मर्चेंट आणि तिचा पती सुयश रॉय या दोघांनी नुकतीच आता सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. ते दोघे या वर्षी आई-वडील होणार आहेत.

त्यांनी ही गुड न्यूज शेअर केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी प्रचंड कमेंट्सचा पाऊस पाडला. त्यांना सगळीकडून अभिनंदन करण्यासाठी मेसेजेसचा प्रचंड वर्षाव होत आहे. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे, किश्वर ही तब्बल 40 व्या वर्षी प्रेग्नंट झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

सुयश ने इन्स्टाग्राम किश्वर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे व या फोटोद्वारे त्याने त्यांच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी सांगितली की, “आम्ही लवकरच आता आई वडील बनणार आहोत.” पोस्ट मध्ये त्यानेअसे लिहिले होते की,“ मै तेरे बच्चे का बाप बनने वाला हु, हमे ऑगस्ट का इंतजार है.”

सुयशने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला आहे. तो समुद्र किनारी काढलेला दिसत आहे. या फोटोमध्ये किश्वर देखील सोबत आहे. किश्वर तिच्या बेबी बंपसह दिसत आहे आणि सुयशने गुडग्यावर बसून तिच्या पोटावर हात ठेवला आहे आणि या फोटोच्या समोर समुद्राच्या वाळूमध्ये 2021 अस लिहिलेलं आहे.

किश्वरने हा फोटो इन्स्टाग्राम वर शेअर करत असे लिहिले की, “तुम्ही कधी आई-वडील बननार आहात. आम्हाला तर ऑगस्टची खूप आतुरता आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

किश्वरने मूलखतीमध्ये असा खुलासा केला की, “मी सुयशला प्रेग्नन्सी टेस्टिंग किट आणायला सांगितले होते व तेव्हा आम्हाला कळाले की मी प्रेग्नंट आहे. ती वेळ खूप आश्चर्यचकित करून सोडणारी होती. कारण आम्हाला याची काहीच माहिती नव्हती. आम्ही याची काही तयारी केली नव्हती. सुरवातीला हा आम्हाला आश्चर्यदायक झटका होता. मात्र, नंतर सुखददायक गिफ्ट बनलं आहे.

वडील बनणार आहे म्हणून सुयश बोलला की, “आमच्या लग्नाला 5 वर्ष झाले तरी आम्ही आई वडील बनण्याचा निर्णय घेतला नव्हता. मात्र, नंतर आम्हाला कळाले की आम्हाला हे देवाने दिलेलं गिफ्ट आहे.

हा देवाचा आशीर्वाद आहे आणि आता आम्ही आमच्या या आनंदी क्षणांचा प्रचंड आनंद घेणार आहोत. लग्नाच्या इतक्या वर्षानंतर किश्वरने मला हा सरप्राईज दिले आहे.” असे तो म्हटला आहे.

तब्बल 40 व्या वर्षी प्प्रेग्नंट होण्यावर किश्वरने सांगितले की, “आपल्या मनाप्रमाणे परिवार नियोजन करणे पूर्णपणे बरोबर आहे. 40 व्या वर्षी देखील मी पुर्णपणे नैसर्गिकरित्या प्रेग्नेंट झाले आहे. मी महिलांना एक सल्ला देऊ इच्छिते की, तुम्ही काही काळजी करू नका. माझ्यासारखेच तुम्ही देखील 35 ते 36 व्या वर्षी लग्न करून देखील आई बनू शकता.

किश्वर आणि सुयश हे दोघेही खूप दिवसापासून एकमेकांस डेट करत होते. शेवटी 16 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. किश्वर वयाने सुयश पेक्षा तब्बल 8 वर्षांनी मोठी आहे. किश्वरचा जन्म 1981 मध्ये झाला. तर, सुयशचा जन्म 1989 मध्ये झाला होता. 2015 मध्ये दोघेही सलमान खानचा बिग बॉस या शोमध्ये दिसले होते. तिथे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती.

इथूनच त्यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. किश्वरने शक्तिमान,बाबूल की दुआये लेती जा, देस मै निकला होदा चांद,कुटुंब,कसोटी जिंदगी की,धकडन,पिया का घर,खिचडी,कसम से,काजल,काव्यांजली यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.