कलाविश्वातील हे १० कलाकार पडले दुसऱ्यांदा प्रेमात..महेश मांजरेकर पासून ते…

मित्रहो प्रेम हे कधीही आणि कसेही होऊ शकते, त्यामुळे दोन जीव कधी एकमेकांत गुंततील याचा नेम नसतो. आपण सिनेइंडस्ट्री मधील अनेकदा सेलेब्सचे ब्रेकअप, घटस्फोट होऊन पुन्हा दुसरी लग्नगाठ बांधल्याची बातमी पाहत असतो. मित्रहो आज आपण यातील काही सुपरस्टार कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी आपल्या आयुष्यात दुसऱ्यांदा प्रेमाचा बहर आणला आहे.

यामध्ये सर्वप्रथम आपण महेश मांजरेकर यांच्या बद्दल जाणून घेऊया. महेश मांजरेकर हे हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत.एक कलाकार म्हणून त्यांनी रसिकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा मेहता असे होते, ती एक कॉश्च्युम डिझायनर होती. मात्र लग्नाच्या काही वर्षांनंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनेते महेश यांनी अभिनेत्री मेधा हिच्याशी लग्न केले. आता त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत, तसेच मेधा यांना पहिल्या पतीपासून दोन मुली आहेत.

तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वांचा लाडका शशांक केतकर देखील यामध्ये गणला जातो. शशांकने “होणार सून मी या घरची” या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. याच सेटवर त्याची आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची ओळख झाली होती. हळूहळू या ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि पुढे हीच मैत्री प्रेमात बदलून त्यांनी लग्नगाठ बांधली. मात्र नंतर अवघ्या एका वर्षातच विलग होण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर शशांकने प्रियांका ढवळे हिच्याशी विवाह केला.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सुद्धा नेहमीच चर्चेत असते, तिने काही वर्षांपूर्वी आपली लग्नगाठ अमेय निपानकर याच्याशी बांधली होती. त्यांचे खूपसे फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले होते, मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही आणि ते एकमेकांना घटस्फोट देऊन नात्यातुन मुक्त झाले व त्यानंतर शर्मिष्ठाने पुन्हा एकदा तेजस देसाई सोबत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे. तेजस सोबत तिने हे दुसरे लग्न केले आहे.

तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वात जास्त लोकप्रिय अभिनेता सुयश टिळक, नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याची आणि अक्षया देवधरची जोडी अनेकांना आवडत होती, त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत होते. मात्र आता सुयशने आयुषी भावे सोबत लग्न केले आहे. तो आयुषी सोबतचे अनेक फोटो चाहत्यांशी शेअर करत असतो.

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीतील सध्याचे सर्वात जास्त लोकप्रिय आणि चर्चेत असणारे जोडपे म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर होय. या दोघांनी अक्षरशः सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या दोघांची जोडी खरच खूप छान आहे. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता सिद्धार्थ हा गेली बरीच वर्षे मुग्धा परांजपे हिला डेट करत होता. पण काही कारणाने त्यांचे ब्रेकअप झाले आणि त्याच्या आयुष्यात मिताली आली. २४ जानेवारी २०२१ रोजी त्यांचे लग्न झाले होते.

आपल्या अतरंगी अभिनयातून नेहमीच रसिकांना आकर्षित करणारे अभिनेते गिरीश ओक हे सुद्धा यामध्ये गणले जातात. गिरीश हे “अग्गबाई सासूबाई” या मालिकेतून अगदी घराघरात पोहचले आहेत. त्यांनी पद्मश्री पाठक सोबत आपली लग्नगाठ बांधली होती, त्या दोघांना गिरीजा ओक ही एक सुरेख मुलगी देखील आहे. पण त्यांचा घटस्फोट झाला आणि पुन्हा गिरीश यांनी पल्लवी सोबत दुसरे लग्न केले व त्यांना पुन्हा दुर्गा नावाची दुसरी मुलगी झाली.

अनेक मालिकांतून नेहमी भेटीस येणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे हीने सुद्धा आपली दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे. २०१४ मध्ये तिने वरून वैटकर सोबत लग्न केले होते. त्यांचे काही फोटो सुद्धा त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते मात्र काही कारणाने लग्नाच्या अवघ्या दोन वर्षानंतर ते वेगळे झाले व त्यांनी घटस्फोट घेतला. आता अभिज्ञाने मेहुल पै सोबत दुसरे लग्न केले असून आता ती संसारात चांगलीच रुळली आहे.

तसेच चित्रपट, मालिकांतून भरपूर प्रसिद्ध झालेली अभिनेत्री रेशम टिपणीस हीने हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता संजीव सेठ सोबत लग्नगाठ बांधली होती. पण या जोडप्याचा सुद्धा २०१४ मध्ये घटस्फोट झाला, आणि ते दोघेही विलग झाले. आता चर्चा सुरू आहे की अभिनेत्री रेशम टिपणीस कीर्तिकरला डेट करत आहे. शिवाय असेही म्हणले जाते की रेशम टिपणीस आणि कीर्तिकर सध्या लिव्ह इन रिलेशनशिप आहे. सोशल मीडियावर त्यांची नेहमीच चर्चा होत असते.

तसेच सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणारी मेधा ही देखील नेहमीच चर्चेत असते, मेधाने “बिग बॉस मराठी” मधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली होती. पण अशीही चर्चा आहे की मेधा लग्नापूर्वीच गरोदर राहिली होती. तिने सिंगल मदर म्हणून आपली जबाबदारी अगदी व्यवस्थित रित्या पार पाडली आहे. तसेच आदित्य याला सुद्धा पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. ते दोघेही उत्तम पती पत्नी व पालक आहेत.

मित्रहो मराठी अभिनय सृष्टीतून मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेला अभिनेता संग्राम समेळ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर सक्रिय असतो. आपल्याला माहीतच आहे की संग्रामने २०१६ मध्ये पल्लवी पाटील सोबत लग्न केले होते. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही व त्यांनी एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. अखेर संग्रामने पुन्हा एकदा त्याची मैत्रिण आणि उत्कृष्ट नृत्यांगना असणारी श्रद्धा फाटक, हिच्याशी लग्नगाठ बांधली.

मित्रहो हे सर्व कलाकार आपल्या भुतकाळाला विसरून नव्याने आयुष्याची सुरुवात केलेले आहेत. त्यांनी पुन्हा एकदा नव्या जोडीदारासोबत आपले जीवन आनंदी बनवले आहे. तुम्ही सुद्धा आयुष्यात असेच नेहमी आनंदी रहा. मंडळी आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.