बॉलिवूड मधील हे कलाकार वयाच्या चाळिशीनंतर बनले बाप! आजोबा होण्याच्या काळात नवा छंद…

मित्रहो बॉलिवूड मधील जेवढे पण कलाकार आहेत, त्यांच्या आयुष्यातील किस्से आपणाला नेहमीच आकर्षित करतात. काहींच्या वैवाहिक आयुष्याबद्दल नेहमी चर्चा रंगलेली असते तर काहींच्या मुलांच्या बाबतीत सुद्धा नेहमी चर्चा सुरू असतात. आज आपण अशा काही कलाकारांच्या बद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना त्यांच्या वयाच्या चाळिशीनंतर सुद्धा मुलं झाली आहेत. हे कलाकार अनेकांना आवडतात, त्यामुळे त्यांना भरपूर लोक चांगलंच ओळखतात.

बॉलिवूड मधील अभिनेता संजय दत्त अनेकांना आवडतो, त्याने आजवर आपल्या उत्कृष्ट अभिनयातून भरपूर प्रमाणात लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवली आहे. त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी थक्क करणाऱ्या आहेत, तसेच काही गोष्टी खूप छान आहेत. त्याने आपले पहिले लग्न ऋचा शर्मा हिच्याशी १९८७ मध्ये केले होते. त्यानंतर १९८८ मध्ये त्याला त्रिशीला नावाची मुलगी झाली होती. त्यानंतर संजयने रिया पिल्लई सोबत लग्न केले होते. पण रिया पासून त्याला कोणतेही मुल झालं नाही. नंतर २००८ मध्ये त्याने मान्यता सोबत लग्न केले होते. त्यावेळी अगदी वयाच्या ५१ व्या वर्षी तो शाहरान आणि इकरा चा पिता बनला.

आणखीन एक अभिनेता म्हणजे प्रकाश राज, त्यांनी २०१० मध्ये पोनी शर्मा या कोरियोग्राफर सोबत लग्न केले होते. हे त्याचे दुसरे लग्न असून, त्यांच्यात १२ वर्षाचे अंतर आहे. जेव्हा ३ फेब्रुवारी २०१६ रोजी प्रकाश ५० वर्षाचा होता, तेव्हा त्याला वेदांत नावाचा मुलगा झाला. याआधी प्रकाशने १९९४ मध्ये अभिनेत्री ललिता कुमारी सोबत लग्न केले होते. मात्र २००९ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता. या दोघांना मेघना, सिधु, पूजा ही मुले झाली, आणि वेदांत हा त्यांना चौथा मुलगा आहे.

तसेच बॉलिवूड मधील सर्वात प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने १९८६ मध्ये रिना दत्त सोबत लग्न केले होते. त्या दोघांना जुनैद आणि इरा अशी दोन मुलं झाली. नंतर २००२ मध्ये आमिर आणि रीना यांचा घटस्फोट झाला होता. यानंतर आमिरने २००५ मध्ये किरण राव सोबत लग्न केले. जेव्हा त्यांच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण झालीत तेव्हा, त्याचे वय ४५ होते आणि वयाच्या ४५ व्या वर्षी तो सरोगेसीच्या मदतीने तिसऱ्यांदा बाप बनला.

तसेच प्रसिद्ध असलेला अर्जुन रामपाल हा देखील वयाच्या ४६ व्या वर्षी पिता बनला होता. २०१९ मध्ये तो तिसऱ्यांदा बाप बनला. अर्जुनची प्रेयसी ग्रिबीएला डिमेट्रिएड्स हीने अरीक या बाळाला जन्म दिला होता. त्याची पहिली पत्नी मेहर जेसीयां हिला देखील दोन मुलं झाली आहेत.

तसेच सर्वांच्या नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता म्हणजे सैफ अली खान, याची जीवनकहानी अनेकांना चांगलीच माहीत आहे. त्याने आपल्या पेक्षा १३ वर्षांनी मोठी असणारी अमृता सिंह हिच्याशी लग्न केले होते. त्यावेळी त्याला सारा व इब्राहिम ही दोन मुले झालीत. मात्र २००४ मध्ये अमृता आणि सैफचा घटस्फोट झाला होता. मग त्याने आपल्या पेक्षा १० वर्षांनी लहान असणाऱ्या करीना कपूर सोबत लग्न केले. २०१६ मध्ये त्याला तैमुर नावाचा मुलगा झाला आणि अगदी वयाच्या ५० व्या वर्षी तो चौथ्यांदा बाप बनला.

तर मित्रहो हे सर्व कलाकार चाळिशीनंतर सुद्धा पिता बनले आहेत. तर आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.