आश्चर्यकारक..! मुंबईच्या रस्त्यावर बाईक चालवताना दिसली ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री..

मित्रहो सोशल मीडियावर नेहमीच काहितरी थक्क करणारे पाहायला मिळते, त्यामुळे अनेक नेटकरी यावर नेहमी सक्रिय असतात. तसेच नुकताच शेअर झालेली एक पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. मित्रहो ही पोस्ट तुम्ही पाहाल तर तुम्ही सुद्धा चकित होऊन जाल. कारण यामध्ये मुंबईच्या रोडवर एक बॉलिवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वतः बाईक चालवताना दिसली आहे. जणू एखादा हिरा सापडावा अशी त्यावेळी लोकांनी गर्दी करून तिचे काही फोटो काढले आहेत.

ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून सर्वांची लाडकी सोनाक्षी सिन्हा आहे, तसेच बाईकवर तिच्या पाठीमागे जहीर इकबाल देखील बसला आहे. सोनाक्षीने यावेळी आपण अजिबात ओळखून येणार नाही याची पूर्ण तयारी केली होती, तिने हेल्मेट घातले होते, मास्क लावला होता. पण जेव्हा ती सिग्नलला थांबली तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या तिच्या चाहत्यांनी तिला ओळखलेच. ती चाहत्यांच्या नजरेतून वाचू शकली नाही. त्यामुळे तिला ओळख दाखवणे भाग पडले.

सोनाक्षीचे हे फोटो मुंबई मधील वांद्रे जवळ बाईक चालवताना काढले गेले आहेत. हे फोटो तर तुफान व्हायरल होतच आहेत, शिवाय यामध्ये आणखी एक गोष्ट चर्चेत येत आहे. ती म्हणजे सोनाक्षी आणि जाहीर यांची जोडी, ते दोघे आजवर खूपदा एकत्र दिसले आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षी “नोटबुक” चित्रपटातील अभिनेता जहिर इकबाल याला डेट करत असल्याची चर्चा सुरू होतीच. सोशल मीडियावर अनेक नेटकरी ही चर्चा रंगवत होते.

View this post on Instagram

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

जहिरच्या वाढदिवसादिवशी सुद्धा अभिनेत्री सोनाक्षीने एक खास पोस्ट शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.त्यानंतर ते दोघे खूपदा एकत्र फिरताना दिसले होते. आता पुन्हा एकदा त्यांचे हे बाईकवरील फोटो सुद्धा खास चर्चेत आले आहेत. एक कलाकार म्हणून त्या दोघांनीही आपल्या अभिनयाची कला उत्तम रीतीने सादर केली आहे, त्यामुळे लाखो लोक त्यांचे चाहते आहेत. बॉलिवूड मधील सर्व कलाकार खूपच प्रसिध्द आहेत, त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील खाजगी घटना देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असतात.

शिवाय या सेलेब्रिटीना सामान्य जीवन जगणे अवघड असते, कारण प्रत्येक ठिकाणी त्यांचे चाहते असतात त्यामुळे त्यांना पाहण्यासाठी नेहमीच ते गर्दी करतात. त्यांची प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर होत असते, म्हणून त्यांना खूप विचारपूर्वक आपले आचरण ठेवावे लागते. पण सोनाक्षी मात्र आता आपल्या बाईक चालवण्याची हौस साजरी केल्यामुळे सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मित्रहो यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेन्ट करून सांगा तसेच आजचा हा लेख आवडला असेल तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.