‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदानाचा हा आहे बॉयफ्रेंड! अभिनेत्री या रावडी अभिनेत्याच्या प्रेमात…

सध्या ‘पुष्पा’ चित्रपटाने सगळीकडेच धुमाकूळ घातलेला दिसत आहे. जिकडे पाहावे तिकडे केवळ याच चित्रपटाची चर्चा आहे. चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रमुख भूमिकेत आहेत. दोघांच्याही भूमिकांचं आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुक होत आहे. त्यामुळे या कलाकारांच्या लोकप्रियतेत बरीच वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळेच या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

विशेषतः अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यातही तिच्या लव्ह लाईफ बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रश्मिका मंदानाला नॅशनल क्रशचा दर्जा मिळालेला आहे. त्यामुळे या अभिनेत्रीचा जो कोणी जोडीदार असेल, तो खूपच भाग्यवान असेल, असे तिच्या चाहत्यांचे मत आहे. तिचे चाहते नेहमीच हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात, की रश्मिका मंदानाचा बॉयफ्रेंड कोण आहे किंवा ती कोणाला डेट करत आहे.

सध्या रश्मिका मंदानाच्या डेटींगची बरीच चर्चा सोशल मीडिया वर सुरू आहे. मीडिया रिपोर्टनुसार, रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत. अभिनेता विजय देवरकोंडा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक गाजलेलं नाव आहे. विशेषतः ‘अर्जुन रेड्डी’ या चित्रपटानंतर तर त्याचा बराच बोलबाला झाला. सध्या रश्मिका याच रावडी हिरोला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट्सनी सांगितले आहे. मात्र या दोघांकडून मात्र याबाबत अजून कोणतेच अपडेट्स मिळालेले नाहीत.

रश्मिका मंदाना सध्या दाक्षिणात्य चित्रपटांसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम करण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती ‘मिशन मजनू’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूड मध्ये एंट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत काम करताना दिसणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपलं नाव गाजवल्यानंतर आता रश्मिका बॉलिवूड गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. रश्मिका मंदानाचे चाहते आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पहात आहेत.

मंडळी, तुम्हीही रश्मिकाच्या आगामी चित्रपटाची वाट बघत आहात का? तुम्हाला रश्मिका मंदाना एक अभिनेत्री म्हणून आवडते का? तसेच तिचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात? आम्हाला या गोष्टी कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या आवडत्या कलाकारांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आणत राहू. आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.