अबब! इतक्या करोडोंची मालकीण आहे ‘ही’ दाक्षिणात्य अभिनेत्री! जगते लक्झरी लाईफ…

तेलगू आणि कन्नड चित्रपटसृष्टीतलं नावाजलेलं नाव म्हणजे रश्मिका मंदना. २०१६ मध्ये तिने ‘किरीक पार्टी’ या कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. २०१८ मध्ये तिने ‘चालो’ चित्रपटातून तेलगू चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री म्हणून रश्मिका मंदनाचं नाव घेतलं जातं. ५ एप्रिल १९९६ रोजी जन्मलेली रश्मिका सध्या २५ वर्षांची आहे.

रश्मिकाचे बऱ्यापैकी सगळेच चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत. अत्यंत कमी वेळात ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक टॉप स्टार बनली आहे. आपल्या अभिनयाने तिने चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या यशाबरोबरच तिने प्रसिद्धी आणि बराच पैसाही कमावला आहे. सोशल मीडिया वर तिचे फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. इतर कलाकारांप्रमाणेच ती देखील एक लक्झरी आयुष्य जगताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

केवळ २५ वर्षांची असलेली रश्मिका करोडोंच्या संपत्तीची मालकीण आहे. कन्नड चित्रपटसृष्टीत ती सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. रश्मिकाची एकूण संपत्ती ३० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे एका रिपोर्टनुसार समजते. तिची एका महिन्याची कमाई ३० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. एका चित्रपटासाठी ती ३ ते ४ कोटी इतके मानधन आकारते.

रश्मिकाकडे अनेक घरे असून तिला कार्स देखील आवडतात. रश्मिकाचे एक घर कर्नाटकमध्ये आहे. या घराची किंमत तब्बल ८ कोटी असल्याचे कळते. याशिवाय तिचे हैद्राबाद आणि मुंबई मध्येही घर आहे. रश्मिकाला कार मधून फिरायची आवड आहे. तिच्याकडे ४ लक्झरी कार्स आहेत. त्यामध्ये ६० लाख रुपयांची ऑडी क्यू ३, टोयोटा इनोव्हा, १ कोटी रुपयांची मर्सिडीझ बेन्झ सी-क्लास आणि २५ लाख रुपयांची ह्युंदाई क्रेटा देखील आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rashmika Mandanna (@rashmika_mandanna)

रश्मिकाला डिझायनर बॅग्ज आणि स्टायलिश फुटवेअरची देखील प्रचंड आवड आहे. तिचे कपाट ब्रँडेड बॅग्ज आणि फुटवेअरने भरलेले आहे. एका अंदाजानुसार, रश्मिकाच्या एका बॅगची किंमत सुमारे ३ लाख रुपये आहे.

रश्मिकाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा तेव्हा ती एकतर डान्स करते किंवा जिम मध्ये जाते. प्रवासाचीही तिला खूप आवड आहे. वेळ मिळाला की आपल्या कार मधून ती प्रवासाला बाहेर पडते. तिचा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी आहे, तर आवडता अभिनेता रजनीकांत आहे.

मंडळी, रश्मिका मंदना तुमची आवडती अभिनेत्री आहे का? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा.