‘चला हवा येऊ द्या’ फेम सागर कारंडे अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी करायचा हे काम! मुलाखत देताना…

झी मराठी वाहिनी वरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम गेली अनेक वर्षं रसिक प्रेक्षकांना हसवण्याचं काम करत आहे. यातील सगळेच कलाकार आपल्या विनोदाच्या अफलातून शैलीने आणि अचूक टायमिंगने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. त्यामुळे हे सगळेच कलाकार आता प्रेक्षकांचे लाडके बनले आहेत. या कलाकारांना या कार्यक्रमामुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. यातील सागरिका कारंडेच्या पात्रासाठी प्रसिद्ध असलेला आणि निळू फुलेंची उत्तम मिमिक्री करणारा कलाकार आहे सागर कारंडे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)

सागरने अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाने त्याला घराघरांत पोहोचवले. सागर आपल्या सगळ्याच भूमिका खूप समरसून पार पडताना दिसतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की सागर अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी एका कंपनी जॉब करायचा? हो, सागर एका कंपनीत जॉब करत असे. पण त्याचे मन काही त्या जॉबमध्ये कधी रमले नाही. सागर कॉम्प्युटर इंजिनियर आहे. पदवी घेतल्यानंतर जरी तो जॉब करू लागला होता, तरी अभिनयाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नाटकाच्या ध्यासापायी अखेर त्याने नोकरी सोडली आणि पूर्णवेळ व्यावसायिक नाटकात उतरायचा निर्णय घेतला.

एका मुलाखतीदरम्यान सागरने त्याच्या या जॉब प्रकरणाबद्दल काह इखुलासे केलेले पाहायला मिळाले. याविषयी सांगताना तो म्हणाला, “माझे वडील आणि काका मुलाखतीसाठी कंपन्यांमध्ये पाठवायचे. परंतु मला तिथे जाण्यात जराही रस नसल्याने मी इकडेतिकडे फिरायचो आणि नंतर माझी निवडच झाली नाही असं घरी फोन करून सांगायचो.”

अभिनय करायला सुरुवात केल्यानंतर त्याच्या सुरुवातीच्या दिवसांमधला एक किस्सा सागरने शेअर केला होता. त्यानं सांगितलं, “त्यावेळी नाटकातून पैसे मिळायचे हे मला माहीतच नव्हतं. चर्चगेट येथील एलआयसीच्या कार्यालयात सत्यनारायणाच्या पूजेच्या वेळी काहीतरी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करायला मला बोलावलं. मी तिथे गेलो आणि दहा मिनिटांचं नाटुकलं सादर केलं. त्याचं मला एकशे एक रुपये मानधन मिळालं. माझ्या उभ्या आयुष्यात मानधन हा शब्द त्यावेळी पहिल्यांदा ऐकला मी.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saagar Karande 😍 (@saagarkarande)

प्रत्येक कलाकाराला स्ट्रगल करावा लागतो आणि सागर कारंडेनेही तो केला आहे. आता मात्र त्याने आपल्या अभिनयाच्या जोरावर यश मिळवलेले दिसत आहे. याची झलक त्याच्या चित्रपटांमधून आणि नाटकांमधून दिसतेच आहे. प्रेक्षकही त्याला नेहमीच त्याच्या कामाची पोचपावती कौतुकाच्या स्वरूपात देतच असतात. नाटक आणि चित्रपटांव्यतिरिक्त सागरने अनेक हास्यकार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.