सलमानला या दोन अभिनेत्यांनी दिले खुले चालेंज, ईदला ‘टायगर ३’ सोबत करणार आपले हि चित्रपट प्रदर्शित..म्हणाले..

सलमान खान यांच्या चित्रपट टायगर ३ च्या समोर अजय देवगन यांचा मेडे हा चित्रपट व ज्युनिअर एनटीआर यांचा येणारा चित्रपट अशी आव्हाने आहेत. हे तिन्ही चित्रपट पुढच्या वर्षी ईद या दिवशी रिलीज होणार आहेत.

बॉलीवूड चे भाईजान सलमान खान यांनी टायगर ३ या चित्रपटाची शूटिंग सुरू केली आहे. हा चित्रपट टायगर सिरीज चा ३ चित्रपट आहे यशराज बॅनर हे उच्च स्तरावर शूट करत आहेत. या चित्रपटात सलमान खान यांच्या सोबत कटरीना कैफ व रणवीर शौरी सारखे कलाकार दिसून येतील.

भाईजान यांनी काही दिवसा पूर्वीच उघडकीस आणले की ते त्यांचा चित्रपट टायगर ३ हा पुढच्या वर्षी ईद च्या दिवशी रिलीज करणार. सलमान खान आपले चित्रपट नेहमी ईद च्या दिवशी रिलीज करतात या मुळे ट्रेड एक्सपर्ट टायगर ३ कमाई ची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यांचं मानन आहे की भाईजान यांचे चित्रपटच बॉलीवूड चा घा’टा कमी करू शकतात.

सलमान खानच असे एकटे अभिनेते नाहीत की ज्यांनी आपला चित्रपट ईद च्या दिवशी रिलीज करणार आहेत.याशिवाय अजून दोन अभिनेते आहेत की ते पुढच्या वर्षी ईद च्या दिवशी चित्रपट रिलीज करणार आहेत. ते सुद्धा जास्त कमाई ची इच्छा व्यक्त करत आहेत. या मधून एक तर सलमान खान यांचे चांगले मित्र अजय देवगन हे आहेत.

होय खरच आम्ही मस्करी नाही करत आहोत अजय देवगन आपला येणारा चित्रपट मेडे (mayday) हा २०२२ मध्ये ईद दिवशी प्रदर्शित करणार आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी देखील अभिनय केला आहे. हा कन्टेन्ट बेस्ड चित्रपट आहे. हल्ली या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे.

अजय देवगन या शिवाय साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर (J.r NTR ) देखील आपला चित्रपट पुढच्या वर्षी ईद च्या दिवशी रिलीज करणार आहेत. ज्युनिअर एनटीआर यांनी आताच सूचित केले आहे की पुढचा चित्रपटात ते साउथ चे सुप्रसिद्ध दिग्दर्शक शिवा यांच्या सोबत काम करणार आहेत.

यांचा हा चित्रपट पुढच्या वर्षी ईद च्या दिवशी रिलीज होणार आहे. हा चित्रपट साउथ चा वेगवेगळ्या भाषा सोबत हिंदी मध्ये देखील रिलीज करणार आहेत. पुढच्या वर्षी तुम्ही ईद च्या दिवशी कोणता चित्रपट पाहाल ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.