अडला हरी गाढवाचे पाय धरी! टिकटॉक फेम सूरज चव्हाण या चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर प्रदार्पण, मीडियामध्ये उडाले चर्चेला उधाण…

मित्रहो टिकटॉक हे एक असे माध्यम आहे जिथे अनेक नव्या कलाकारांची खुल्याने पारख होते. यांच्यातूनच नवे कलाकार आपल्या भेटीस येतात. यातीलच एक उत्कृष्ट कलाकार आणि अनेकांच्या हृदयाची धडधड असणारा सूरज चव्हाण लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे. सूरजने आपल्या बोबड्या बोलीतून एक विशेष ओळख मिळवली आहे, अनेकांचे हृदय जिंकले आहे. आई वडील नसलेला सूरज अनाथ असूनही अवघ्या महाराष्ट्राचा लाडका बनला आहे.

त्याचे बोबडे पण हे अनेकदा लोकांनी आपल्या नजरेत ठसवले आणि हास्याचे फवारे उडवले पण सूरजने कसलाच न्यूनगंड न पाळता सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत पोहचण्याचा एक सुंदर प्रयत्न केला आहे जो भरपूर प्रमाणात यशस्वी देखील झाला आहे. सूरज आता सह्याद्री फिल्म प्रॉडक्शन च्या प्रशांत शिंगटे यांच्या “का रं देवा” या आगामी चित्रपटात झळकणार आहे. त्यामुळे त्याचा आणि त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये.

बारामती मधील मोडवे गावचा हा सूरज चव्हाण याची सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशांत शिंगटे यांच्याशी ओळख झाली. यानंतर त्यांनी सुरजला आपल्या आगामी चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली, जी पाहून सूरज अगदी थक्क होऊन गेला. कारण लिहता वाचता न येणाऱ्या एका अशिक्षित मुलाला अचानक कोणी येऊन चित्रपटाची ऑफर देतोय म्हणल्यावर साहजिकच सगळेजण थक्क होणार. पण प्रशांत शिंगटे हे नेहमीच नवख्या कलाकारांना संधी देत असतात.

सुरजच्या शैलीला शोभेल अशीच भूमिका त्याला दिली जात आहे, यामध्ये त्याला एका कॉलेज कुमारची भूमिका साकारायची आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन रंजित दशरथ जाधव यांनी केले आहे. तर यामध्ये अभिनेत्री मोनालीसा बागल, मयूर लाड, जयवंत वाडकर, अरुण नलावडे, नागेश भोसले इत्यादी कलाकार आहेत. हे कलाकार चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील.

येत्या फेब्रुवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, सुरजचे सर्व चाहते भलतेच उत्सुक झाले आहेत. आजवर सोशल मीडियावर टिक टॉक आणि रिल्सच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीस येणारा सूरज आता थेट पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने सर्वांची उत्सुकता भलतीच शिगेला पोहोचली आहे. सुरजची अशीच प्रगती व्हावी, अनेक नवनवीन वाटा त्याला सापडत जाव्या ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.