पाहता क्षणी आपल्या फॅनच्या प्रेमात पडला होता टॉलिवूड स्टार विजय, आहे फिल्मी लव्हस्टोरी..पहा

एका स्ट्रगलिंग ऍक्टरला भेटायला त्याची फॅन चक्क परदेशातून येते. हे ऐकताच तो स्ट्रगलिंग ऍक्टर हैराण होतो आणि तिला भेटतो. मात्र तिला पाहताच तो तिच्या प्रेमात पडतो. पुढे दोघांची प्रेमकहाणी फुलत जाते आणि दोघेही लग्न करून एक सुखी आयुष्य जगू लागतात. ही काही दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या पुढच्या चित्रपटाची कथा नाहीये. एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभावी अशी ही त्याची स्वतःची प्रेमकथा आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Thalapathy vijay (@thalapathy__vijay)

विजयने जेव्हा आपली अभिनय कारकीर्द सुरू केली तेव्हाची गोष्ट आहे ही. विजय हळूहळू चित्रपटसृष्टीत जम बसवू लागला होता. १९९६ मध्ये त्याचा ‘पुवे उनाक्कागा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. भारतासह भारताबाहेरही लोकांनी तो डोक्यावर घेतला. या चित्रपटाने एका स्ट्रगलिंग ऍक्टरला रातोरात स्टार बनवून टाकलं. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या एका भारतीय तमिळ वंशाच्या उद्योगपतीच्या मुलीने हा चित्रपट पाहिला आणि ती विजयची फॅन बनली.

त्याला प्रत्यक्ष भेटून त्याचे अभिनंदन करायचे असे तिने ठरवले. विजय त्यावेळी चेन्नई मध्ये त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. ती मुलगी त्याला सेटवर भेटायला गेली. ही मुलगी आपल्याला भेटायला चक्क लंडनहून भारतात आली आहे हे ऐकून विजय हैराण झाला. त्याची आणि त्या मुलीची जेव्हा भेट झाली तेव्हा तो तिच्यावर खूपच इम्प्रेस झाला.

त्या मुलीचे नाव होते संगीता सोरनालिंगम. या पहिल्या भेटीतच विजयने तिला घरी येण्याचं आमंत्रण दिलं होतं. पुढे ही ओळख मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात रूपांतरित झाली. संगीता विजयच्या आईवडिलांना जेव्हा पहिल्यांदा भेटली तेव्हा त्यांना कल्पनाही नव्हती की ही मुलगी भविष्यात त्यांची सून होईल. एका मुलाखतीत विजयच्या आईने सांगितले, की त्यांना पहिल्या भेटीतच संगीता आवडली होती आणि तिने त्यांच्या मनात घर केले होते.

संगीता आणि विजय एकमेकांना जवळपास ३ वर्षं डेट करत होते. कालांतराने ही बातमी त्यांच्या घरी समजली. त्यानंतर विजयने संगीताला पुन्हा घरी येण्याचं आमंत्रण दिलं. घरी आल्यावर विजयच्या वडिलांनी तिला विचारले, की तू विजयसोबत लग्न करशील का? यावर तिने आनंदाने लगेच होकार दिला. २५ ऑगस्ट १९९९ ला विजय आणि संगीता लग्नाच्या बेडीत अडकले. ख्रिश्चन पद्धतीने झालेल्या या बहुचर्चित लग्नाला टॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. दोघांना आता दोन मुले आहेत.