अभिनेता वरून धवनच्या जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन…कुटुंबातील सदस्य झाले दुःखी…..!!

मित्रहो एखादी अनोळखी व्यक्ती कधी आपलं आयुष्य बनून जाते याचा आपल्यालाच पत्ता लागत नाही. पण जेव्हा ती व्यक्ती आपणाला अचानक सोडून जाते तेव्हा मात्र आपली अवस्था बिकट होऊन जाते. अशीच बिकट अवस्था सध्या बॉलिवूड सुपरस्टार वरून धवन याची झाली असून त्याने आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. ही व्यक्ती म्हणजे मनोज साहू, जे गेले १५ वर्षे अभिनेता वरून धवन यांच्या घरी ड्रायव्हरचे काम करत होते. आजवर वरून धवन आणि त्याच्या कुटुंबाचे मनोज यांच्याशी खुप घट्ट नाते निर्माण झाले होते.

मनोज सकाळी वरूनला घेऊन स्टुडिओ मध्ये गेले होते, वरून त्या स्टुडिओ मध्ये काही जाहिरातींचे शूटिंग करणार होता. पण अचानक त्यावेळी मनोज यांच्या छातीत कळ येऊन दुखू लागले आणि बघता बघता त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना अस पाहून वरूनने लगेचच आपलं काम थांबवल आणि मनोज यांना रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेला,मात्र तिथे पोहचेपर्यंत मनोज यांना आणखीन एक हृदयविकाराचा झटका आला जो त्यांना आपल्या पासून दूर नेणारा ठरला.

ज्यावेळी वरून मनोज याना घेऊन रुग्णालयात पोहचला तेव्हा डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केलं. ही बातमी ऐकून वरून धवन थक्क झाला होता, कारण अचानक सगळं अनपेक्षित अस त्याच्या डोळ्यासमोर घडत होतं. त्याच्या घरी सुद्धा कुटुंबातील सर्व सदस्य ही बातमी ऐकून फार दुःखी झाले आहेत. मनोज यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबाचा कणा हरपल्याने त्यांची पत्नीला देखील अश्रू अनावर होत आहेत, शिवाय बापाचे छत्र गेल्याने मुले सुद्धा रडत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Gossip Girl💋👑 (@bolly_newzz)

वरून हा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असतो, मात्र आता तो मनोज यांच्या निधनामुळे पुन्हा चर्चेचे कारण ठरत आहे. त्याने नुकताच जुग जुग जियोचे शूटिंग संपवले आहे, यामध्ये तो कियारा अडवाणी सोबत दिसणार आहे. त्याने देखील मनोज यांच्या निधनाच्या वार्तेवर दुःख व्यक्त केलं आहे. सोशल मीडियावर सर्व नेटकरी सुद्धा भावुक झाले आहेत. आपल्या नेहमी सोबत असणारी व्यक्ती अचानक साथ सोडली की खूप एकटं एकटं वाटत. प्रत्येक वेळी काही तरी हरवल्यासारखं जाणवत.

वरूनला सुद्धा मनोज यांची खूप सवय झाली होती, ते दोघे नेहमी एकत्र दिसत होते. मनोज कित्येकदा वरूनच्या शूटिंगच्या ठिकाणी येत असत, त्यामुळे वरून आणि मनोज पक्के मित्र बनले होते. पण आपला मित्र असा अचानक सोडून गेल्याने वरून आता खुप दुःखी झाला आहे. पण मनोज जरी आपल्यात नसले तरीही ते आपल्या सत्कर्मामुळे नेहमीच आठवणीत वसतील. आमच्याकडून ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!