तुर्कीची प्रेयसी अन भारताचा प्रियकर! या लैला मजनूने केला विवाह, सोशल मीडियावर बोलबाला…

मित्रहो आपल्या आयुष्यात कधी कोणाचे आगमन होईल सांगता येत नाही. काहींचे नशीबच वेगळे लिहलेले असावे म्हणून तर कधीच कल्पना न केलेल्या घटना घडतात. तसेच प्रेम हे सर्वांच्या आयुष्यात येते, कधी टिकते तर कधी सगळं उधळून लावतो. आपणाला कधी कोणासोबत प्रेम होईल ते सांगता येत नाही. खास म्हणजे समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आवडणे गरजेचे असते. त्यामुळे प्रेमकहाणी अगदी खास बनून जाते. आज आपण अशीच एक खास लव्हस्टोरी जाणून घेणार आहोत.

ही लव्हस्टोरी आहे तुर्कीच्या प्रेयसीची आणि आंध्रप्रदेशच्या प्रियकराची. ही प्रेयसी म्हणजे गिजेम आहे, तिला आंध्रप्रदेश मधील मधू संकरित हा खूप आवडतो.त्यांची २०१६ मध्ये भेट झाली होती. एका कामाच्या निमित्ताने त्यांची ही भेट घडली होती. अनोळखी बनून भेटलेले हे दोघेही बघता बघता कधी मित्र बनले हे त्यांनाच कळले नाही. दरम्यान संकरित तुर्किला कामानिमित्त गेले होते. तेव्हा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. त्यांचे हे प्रेम निराळेच होते, अगदी एकमेकांवर जीव ओवाळून टाकतात हे दोघेजण.

Image Source: aajtak

मैत्री नंतर प्रेम अन प्रेमानंतर या दोघांनी आपल्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी लग्नाचा विचार केला आणि २०१९ मध्ये त्यांनी साखरपुडा करून घेतला. पण त्यांना अजूनही घरातून आई वडिलांकडून लग्नासाठी परवानगी मिळाली न्हवती. हे दोघेही खरच खूप शांत आणि संस्कारी आहेत, कारण त्यांनी आपल्या लग्नासाठी आपल्या आई वडिलांच्या परवानगीची आतुरतेने वाट पाहिली होती. मात्र त्यांची ही आतुरता व्यर्थ न घालवता त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्यांना अखेर परवानगी दिलीच.

जेव्हा त्यांनी २०२० मध्ये लग्नाची तयारी सुरू केली होती तेव्हा कोरोना महामारी येऊन ठेपली, त्यामुळे त्यांनी हा प्लॅन कॅन्सल करून टाकला. त्यानंतर त्यांनी जुलै २०२१ मध्ये आधी तुर्की मध्ये लग्न केले व नंतर मंगळवारी ते पारंपरिक पद्धतीने गुंटूर मध्ये तेलगू रीती रिवाज प्रमाणे लग्नबंधनात अडकले. परदेशी सून पाहून आसपासचे लोक देखील चकित झाले होते. हा विवाह अगदी डोळ्यांना थक्क सोहळाच म्हणावा लागेल.

तुर्की ते गुंटूर पर्यंत जवळपास ५ हजार किलोमीटरचे अंतर असून, एवढ्या लांबून ही गिजेम आपल्या मधू साठी आली हे पाहून प्रेमावर आणखीन विश्वास घट्ट बनत चालला आहे. त्या दोघांनाही त्यांच्या नवीन आयुष्याच्या नव्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.