दुःखद! ‘तारक मेहता..’ मधील नट्टू काकांचे दुःखद नि’धन, ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास..

तारक मेहता का उल्टा चष्मा मधील नट्टू काका म्हणजेच घनश्याम नायक यांचे आहे निध’न झाले आहे. ते बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होते. वयाच्या ७७ व्या वर्षी अखेर त्यांनी मुंबई येथे श्वास घेतला. अभिनेता घनश्याम नाईक यांनी मालिका वातिरिक्त हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे.

घनश्याम नायक यांचा जन्म १२ मे १९४५ रोजी मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर तालुक्यातील धांधई गावात झाला होता त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती आणि त्यांनी आवडीपोटी स्त्रीची भूमिकाही केली आहे. त्यानंतर त्यांनी मुंबई जय रामलीलामध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

प्रसारमाध्यमांशी केलेल्या संभाषणात त्यांचा मुलगा विकास नाईक म्हणाला, “बाबा चांगले आहेत. पूर्वीपेक्षा बरेच चांगले, परंतु आता त्यांना अधिक विश्रांतीची आवश्यकता आहे. म्हणूनच ते शो शूट करू शकत नाहीत.

‘तारक मेहता ..’ फॅन क्लबने ७७ वर्षीय घनश्याम नायक यांची दोन छायाचित्रे शेअर केली. घनश्याम नायक यांचे या फोटोमध्ये बरेच वजन कमी झाल्याचे दिसून येते आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by tmkoc fan❤️❤️❤️ (@tmkoc_scenes)

जेठालाल गडा यांच्या इलेक्ट्रॉनिक्स शॉप मध्ये काम करणारे नटू काका हे अतिशय विनोदी पात्र आहे. ते जरी जेठालालच्या हाताखाली काम करत असले तरी जेठालाल त्यांचा नेहमी आदर करतो. त्यांना आपल्या वडिलांसारखा मानतो. गोकुलधाम सोसायटीमध्येही त्यांना खूप आदराने आणि मानाने वागवले जाते. आपल्याला हवे तसे जेठालाल कडून वदवून घेणारे, हवी तेव्हा सुट्टी घेणारे, पण आपल्या कामात चोख असलेले नटू काका सगळ्यांचेच आवडते आहेत.

मात्र सगळ्यांच्या या लाडक्या नटू काकांनी अचानकच एक्झिट घेतली आहे. ही एक्झिट मालिकेतील नसून त्यांच्या खऱ्या आयुष्यातील आहे. ही मजेशीर भूमिका साकारली होती अभिनेते घनश्याम नायक यांनी. १२ मे १९४५ रोजी त्यांचा जन्म झाला होता. बराच काळ ते कर्क’रो’गाशी झुंज देत होते. अखेर त्यांची ही झुंज संपवत मृ’त्यूने त्यांच्यावर विजय मिळवला आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला.