ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती चिंताजनक, या कारणाने दवाखान्यात झाले दाखल…

मित्रहो हल्ली दिवस खरच खूप गंभीर करणारे येत आहेत, दिवसेंदिवस पायाखालची जमीन सरकवणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. सोशल मीडियावर आणखी एक खबर आता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे, मित्रहो ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची तब्येत देखील अस्थिर झाली होती. म्हणून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या दवाखान्यात त्यांना दाखल केले.

त्यांची प्रकृती चिंताजनक होती मात्र उपचार सुरू असून आता त्यांची तब्येत थोडीफार स्थिर झाली आहे. सोशल मीडियावर त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी एक व्हिडिओ शेअर करून अमोल पालेकर यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती दिली आहे. त्या मीडियाशी बोलताना म्हणाल्या की “अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. एका दीर्घ आजारामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. जास्त स्मोकिंग मुळे मागे देखील त्यांना दहा वर्षांपूर्वी असाच त्रास जाणवू लागला होता.

परंतु आता देखील या आजाराने पुन्हा डोके वर काढलेले जाणवले. मात्र ताबडतोब त्यांना दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात आणले गेले.आता उपचार सुरू आहेत आणि अमोल पालेकर डॉक्टरांच्या प्रयत्नाला प्रतिसाद देत आहेत. आता अमोल पालेकर यांच्या प्रकृतीत आता सुधारणा जाणवत आहे. आणि आता चिंता करण्याचे काही कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे.” संध्या गोखले यांनी अशी खबर दिल्यामुळे अमोल पालेकर यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

अमोल हे एक सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांनी गोलमाल, श्रीमान श्रीमती, नरम गरम,घरोंदा, रंगीबेरंगी, छोटीसी बात, चितचोर, भूमिका, पहेली यांसारख्या चित्रपटात काम केले होते. त्यांचा पाहिला चित्रपट “शांतता कोर्ट चालू आहे” हा होता. या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांचा “गोलमाल” हा हिंदी चित्रपट खुप जास्त प्रसिद्ध झाला होता. तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेला “२०० हल्ला हो” हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये रिंकू राजगुरू हीने अभिनय केला आहे.

या चित्रपटाचे लेखन अमोल पालेकर व त्यांच्या पत्नीने केले होते, एक कलाकार म्हणून अमोल यांनी आजवर रसिकांची खूप मने जिंकली आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकांसह त्यांच्यावर देखील प्रेक्षकांचे खुप प्रेम आहे. ही लोकप्रियता त्यांना अशीच मिळत राहो ही सदिच्छा. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.