धक्कादायक..! मराठी..हिंदी मधील दिग्गज अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी झाले निधन…

मित्रहो मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर आपल्या अभिनय कौशल्याने विशेष प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवणारे अभिनेते रमेश देव यांनी नुकताच या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या अशा आकस्मित निधनाने अनेकजण थक्क झाले आहेत. कारण ३ दिवसांपूर्वीच त्यांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला होता. सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मात्र हार्ट अटॅक मुळे त्यांचे निधन झाले.

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते, जेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा त्यांना लगेचच दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारासाठी त्यांच्या शरीराने साथ दिली नाही आणि वयाच्या अवघ्या ९३ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली. १९५० त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी हळूहळू अभिनय क्षेत्रात आपल्या कलेची जादू दाखवण्यास सुरुवात केली.

आपल्या पूर्ण करिअर मध्ये त्यांनी जवळपास २८५ हिंदी चित्रपट तसेच १९० मराठी चित्रपट आणि ३० मराठी नाटकांमध्ये काम केले आहे. त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना खूपदा राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा बहाल करण्यात आले होते. तसेच त्यांनी खूपसे चित्रपट आणि २५० पेक्षा अधिक मालिकांची निर्मिती केली आहे. त्यांच्या अभिनयाला अनेकजण पसंत करतात. शिवाय भरपूर लोक त्यांचे चाहते आहेत.

अमरावती जिल्हा हे त्यांचे जन्मस्थान आहे. त्यांची पत्नी देखील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यांचे नाव सीमा देव आहे, त्यांना आज अनेक लोक चांगलेच ओळखतात. सीमा आणि रमेश यांची जोडी अनेकांना आवडते, ते दोघेही उत्तम कलाकार म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहेत. अनेक चित्रपटात त्या दोघांनी एकत्र काम केले आहे.

सीमा देव सोबत रमेश यांचे अनेक चित्रपट कलाक्षेत्रात प्रसिद्ध झाले असून, त्या दोघांची खूपशी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर घोळतात. असे हे उत्कृष्ट कलाकार म्हणून लोकप्रिय झालेले रमेश देव आता आपल्या सोबत नाहीत हो खबर ऐकून अनेकजण हळहळ व्यक्त करत आहेत. कलेचे पुजारी रमेश देव जरी आपल्यात नसले तरीही ते नेहमीच आपल्या अभिनयातून अविस्मरणीय ठरतील. आमच्याकडूनही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!