लग्नाच्या काही दिवसातच विकी आणि कॅटरिना झाले वेगळे! घरदार सोडून राहतात विराट कोहलीच्या इमारतीत..

खूप दिवसापासून अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या लग्नाची चर्चा चाहत्यांमध्ये जोरदार होत आहे. सुरुवातीला त्यांनी लग्न करत असल्याचा कोणताही खुलासा केला नाही. तरी प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी पसरली होती आणि मग विकी आणि कॅटरीना च्या लग्नाची चर्चा रंगू लागली. आता अलीकडेच विकी आणि कॅटरिना यांचा लग्न सोहळा पार पडला आहे आणि आता हे दाम्पत्य पुन्हा एकदा सिनेसृष्टीत शूटिंग करण्यासाठी निघाल आहे.

लग्नानंतर विकी कौशल आणि कॅटरिना कैफ हे नवीन घरात शिफ्ट होतील याची चर्चा रंगत होती. आता अलीकडेच दोघांनी एकाच घरात प्रवेश घेतला आहे. ९ डिसेंबर रोजी अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कॅटरिना कैफ यांचा राजस्थानमध्ये विवाह पार पडला. लग्न होताच दुसऱ्या दिवशी ते हनिमूनला निघाले. सध्या ते हनिमूनहून परतले आहेत आणि मुंबईत स्थायिक झाले आहेत. लग्नानंतरची काही विधी पूर्ण झाल्यानंतर ते नवीन घरात प्रवेश करणार आहेत. मागील रविवारी विकी आणि कॅटरिनाच्या नव्या घराची पूजा झाली ज्यामध्ये सर्व कुटुंब उपस्थित होत.

सध्या ही गोष्ट चर्चेमध्ये आहे याचबरोबर चाहत्यांना तिच्या नवीन घराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांचे घर मुंबईतील एका पॉश ठिकाणी आहे. ज्याची किंमत मीडिया रिपोर्टनुसार सुमारे वीस कोटी रुपये अंदाजे आहे. कॅटरिना आणि विकीने हे घर विकत घेतले नसून ते भाड्याने घेतले आहे असे समजत आहे याचे भाडे देखील हजारांमध्ये नसून लाखांमध्ये आहे. माहितीनुसार या घराचे भाडे सुमारे नऊ लाख रुपये इतके आहे. हे भाडे दर महिन्याला विकी आणि कॅटरिना नवे दाम्पत्य सुमारे नऊ लाख रुपये घराचे भाडे देणार आहेत.

विशेष म्हणजे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे शेजारी बनले आहेत. दोघांचे फ्लॅट एकत्र नसले तरी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ३४ व्या मजल्यावर राहतात. आणि त्याची किंमत सुमारे ३५ कोटी रुपये इतकी आहे. आता याच इमारतीत विकी आणि कॅटरिना आठव्या मजल्यावर राहणार आहेत. विकी आणि कॅटरिना त्याच्या नवीन घराबद्दल खूप उत्सुक आहेत.

घरामध्ये प्रवेश घेतल्यानंतर कॅटरिना आणि मी खूप रोमॅंटिक पद्धतीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता कि या नव दाम्पत्याने एकमेकांचे हात हातात घेतले आहेत. यातून ते एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत याचबरोबर या फोटो मधील लावलेला फिल्टर देखील प्रेमाचे प्रतीक असल्याचे भासवत आहे. कॅटरीना ही मूळची विदेशातील असून आता ती पंजाबी पद्धतीने वागत असताना दिसत आहे. तर तुम्हाला विकी आणि कॅटरिना यांची जोडी कशी वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा धन्यवाद.