कडक सुरक्षा असूनही विकी-कतरिनाच्या लग्नातील व्हिडिओ व्हायरल! समोर आला वेडिंग व्हेन्यू…

सध्या सगळीकडेच अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. खरंतर दोघांनीही आपलं नातं नेहमीच गुप्त ठेवलं आहे. असावेळी अचानक त्यांच्या लग्नाची बातमी आल्यानंतर सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटलं होतं. लग्नाची यातरी देखील अत्यंत खासगी स्वरूपात करण्यात आली आहे. याबद्दल अजून कतरिना किंवा विकीने मात्र कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही.

तरीही या दोघांच्या लग्नाच्या तयारीच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत. विकी आणि कतरिनाचे लग्न राजस्थानमध्ये होणार आहे. या लग्नाच्या बाबतीत बरीच गुप्तता पाळण्यात आली आहे. शिवाय लग्न ज्या ठिकाणी असणार आहे, तिथेही बरीच सिक्युरिटी आहे. त्या व्हेन्यूवर कोणताही मोबाईल किंवा कॅमेरा नेण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही दोघांच्या लग्नाच्या व्हेन्यूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

या व्हिडिओ मध्ये पाहुण्यांचे स्वागत होताना दिसत आहे. एका राजेशाही किल्ल्यावर हे स्वागत होताना दिसत आहे. मागे फटाक्यांची बरीच रोषणाई होत असलेली पाहायला मिळाली आहे. याशिवाय एका खास पद्धतीने पाहुण्यांचे स्वागत होताना दिसत आहे. एक डान्सिंग ग्रुप ‘जोधा अकबर’ चित्रपटातील ‘ख्वाजा मेरे ख्वाजा’ या गाण्यावर पायऱ्यांवर उभा राहून डान्स करताना दिसत आहे. या ग्रुप समोर उभे राहून पाहुणे आपले फोटोसेशन करत असल्याचे दिसत आहेत.

हा व्हिडिओ पाहून विकी आणि कतरिनाचे चाहते प्रचंड खूष झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, आज (८ डिसेंबर) विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या आधीचे विधी सुरू होणार आहेत. आज मेहंदीचा कार्यक्रम असणार आहे. एका रिपोर्टनुसार, विकी आणि कतरिना आधी हिंदू रिवाजानुसार लग्न करणार आहेत. सोमवारी संध्याकाळीच कतरिना आणि तिचे कुटुंबीय राजस्थानला पोहोचले आहेत. विमानतळावर विकी आणि कतरिना दोघेही वेगवेगळी एंट्री करताना दिसून आले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)

हा व्हिडिओ पाहून चाहते खूष झाले असले, तरी अनेकांना एक प्रश्न पडला आहे. विकी आणि कतरिनाच्या लग्नात कोणतेही फोटो काढण्यास मनाई असताना हा व्हिडिओ कसा काढला गेला आहे, तसेच तो व्हायरल कसा काय झाला आहे, असे प्रश्न सध्या अनेकांना पडलेले दिसत आहेत. विकी कौशल आणि कतरिना कैफने आपल्या लग्नाची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही. चाहते या घोषणेची खूप आतुरतेने वाट पहात आहेत.