कतरिनाला सोडून सारा अली खानला गाडीवर घेऊन फिरताना दिसला विकी कौशल, व्हायरल झाला व्हिडिओ..

विकी कौशलचे लग्न ९ डिसेंबरला झाले होते आणि तो आता कामावर परतला आहे. सध्या सारा अली खान मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये शूटिंग करत आहे. विकी आणि सारा त्यांच्या ‘लुका छुपी 2’ चित्रपटाचे शूटिंग या एमपी शहरात करत आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विकी कौशल आणि सारा अली खान दोघेही मार्केटमध्ये बाइकवर दिसत आहेत. विकी बाईक चालवत आहे आणि सारा अली खान मागे बसली आहे.

View this post on Instagram

A post shared by #HisDay❤Vicky’s Hosay ❤ (@vickykaushalafghanfan)

अशातच इंदूरमध्ये सध्या ‘लुका छुप्पी 2’ ची जोरदार धूम आहे आणि शहरातील विविध भागात या चित्रपटाचे शूटिंगही सुरू आहे. या चित्रपटाचे शूटिंग जवळपास महिनाभर चालणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच विकी कौशलने लग्नानंतर लगेचच त्याच्या चित्रपटांवर काम सुरू केले आहे.

‘लुका छुपी’ मध्ये क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले होते. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, विनय पाठक आणि अपारशक्ती खुराना देखील होते. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते, तसेच आशय आणि विनोदामुळे चित्रपटाला पसंतीही मिळाली होती.