या मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत विकी कौशलच्या भावाचे होणार लग्न! स्वतः अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण..

नुकताच अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलचा भव्य विवाह सोहळा पार पडला. या लग्नाची बरीच चर्चा झाली. कतरिना आणि विकीने जेव्हा आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले, तेव्हा ते बरेच व्हायरल होताना दिसले. मात्र या फोटोंमधला एक चेहरा सध्या जरा जास्तच चर्चेत असलेला दिसत आहे. कतरिना सोबत एक मराठमोळी अभिनेत्री दिसत आहे. ही मराठमोळी अभिनेत्री सध्या विकी कौशलच्या भावाला डेट करत असल्याच्या चर्चा सगळीकडे पाहायला मिळत आहेत. कोण आहे ही अभिनेत्री?

ही अभिनेत्री आहे शर्वरी वाघ. कतरिना सोबत तिच्या लग्नाच्या फोटोंमध्ये दिसलेली ही अभिनेत्री विकी कौशलचा लहान भाऊ सनी कौशलला डेट करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता हे दोघे लवकरच लग्न करतील, असा अंदाजही बांधण्यात येत होता. शर्वरी वाघ आणि सनी कौशल यांनी कबीर खानच्या ‘द फरगॉटन आर्मी’ या वेब सिरीज मध्ये एकत्र काम केलं आहे. आता हे दोघे कधी लग्न करणार, अशी उत्सुकता लोकांमध्ये वाढत असतानाच शर्वरीने या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

शर्वरीने याबाबत खरी गोष्ट सांगितली आहे. ‘इंडिया डॉट कॉम’ने दिलेल्या माहिती नुसार, शर्वरी वाघने सनी कौशलला डेट करण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देत सांगितले आहे, की “या सर्व अफवा आहेत. आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. गेल्या चार वर्षांपासून आमची चांगली मैत्री आहे. अफवा या अफवाच असतात. त्यामुळे आमच्यामध्ये काहीतरी आहे, ही देखील एक अफवाच आहे.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sharvari 🐯 (@sharvari)

तिच्या या स्पष्टीकरणामुळे दोघांच्या डेटींगच्या अफवांना काहीशी विश्रांती मिळालेली पाहायला मिळत आहे. शर्वरीने ‘बंटी और बबली २’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या चित्रपटात तिने अभिनेता सिद्धार्थ चतुर्वेदी सोबत काम केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर फारसा गल्ला जमवू शकला नसला, तरी शर्वरीच्या कामाचं बरंच कौतुक करण्यात आलं होतं. अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी तिने अनेक हिंदी चित्रपटांसाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे.

शर्वरी वाघ ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. मनोहर जोशी यांची कन्या नम्रता ही शर्वरीची आई असून त्या आर्किटेक्ट आहेत. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ आहे आणि ते पेशाने बिल्डर आहेत.