‘या’ मराठी मुलीने घेतली लॉर्ड शार्दूल ठाकूरची विकेट! साखरपुड्याचा व्हिडिओ झाला व्हायरल…

क्रीडा जगतात नुकतीच एक धमाकेदार बातमी ऐकायला मिळत आहे. ‘लॉर्ड’ शार्दूल ठाकूरने साखरपुडा केल्याची बातमी सोशल मीडिया वर वाऱ्यासारखी पसरली आहे. शार्दूल सध्या चांगल्या फॉर्म मध्ये खेळत आहे. त्याच्या अष्टपैलू खेळामुळे, विशेषतः त्याच्या फलंदाजीमुळे कमी कालावधीतच त्याचे नाव सर्वत्र पसरले आहे. त्याच्या साखरपुड्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘लॉर्ड’ ची विकेट घेणारी ही मुलगी नक्की आहे तरी कोण, असा प्रश्न क्रीडारसिकांना पडला आहे.

२९ नोव्हेंबर २०२१ ला हा साखरपुड्याचा सोहळा पार पडला. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडलेला पाहायला मिळाला. शार्दूलने आपली गर्लफ्रेंड मिताली परुळकर बरोबर साखरपुडा केला. मिताली आणि शार्दूल बरीच वर्षं एकमेकांना डेट करत आहेत. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये हा साखरपुडा पार पडला. साखरपुड्याला केवळ काही मोजके नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)

या समारंभाचे फोटो आणि व्हिडिओ दिवसभर सोशल मीडिया वर व्हायरल झालेले पाहायला मिळाले. काही सूत्रांच्या मते, शार्दूल आणि मिताली ऑक्टोबर-नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेनंतर विवाहबद्ध होणार आहेत. अजून शार्दूल ठाकूरने आपल्या लग्नाच्या तारखेबद्दल कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही. शार्दूलची होणारी बायको मिताली परुळकर ही एक बिझनेस वूमन असल्याचे कळते. ठाण्यामध्ये तिचा ‘द बेक्स’ नावाने एक बिझनेस असल्याचेही कळते.

शार्दूल ठाकूरने आपल्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवले आहे. त्याने अशाच प्रकारे आपला फॉर्म कायम ठेवला, तर २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याचे संघातील स्थान नक्की होऊ शकतं. शार्दूलला सध्या न्यूझीलंड विरुद्धच्या सगळ्या सामन्यांमध्ये आराम देण्यात आला आहे. टी-२० क्रिकेट सामन्यांमध्येही तो सामिल नव्हता.

आपल्या साखरपुड्यानंतर शार्दूल दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या सामन्यांसाठी रवाना होईल. भारतीय संघ ८ व ९ डिसेंबरला दक्षिण आफ्रिकेला रवाना होणारा आहे. १७ डिसेंबर २०२१ पासून हे सामने सुरू होणार आहेत.

मिताली परुळकर आणि शार्दूल ठाकूरला त्यांच्या साखरपुड्यासाठी खूप शुभेच्छा! लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख कळेल, अशी आशा करायला हरकत नाही. तुमच्या आवडत्या सेलिब्रेटीज बद्दल अशाच काही बातम्या आम्ही घेऊन येत असतो. हे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या सोशल मीडिया हॅन्डल्सना जरूर फॉलो करा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.