सांगा पाहु..! फोटोतील हा मुलगा कोण..? सध्या आहे सुपरस्टार, अनेक चित्रपटात केले आहे काम.

मित्रहो बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार कार्यरत आहेत, त्यामुळे रोजच कोणी ना कोणी वेगवेगळ्या कारणाने चर्चेत येत असतो. तसेच काहीजण अगदी लहानपणापासून या रंगमंचावर कलाकार म्हणून ओळखले जातात. हे बालकलाकार आता याच बॉलिवूड मध्ये सुपरस्टार बनलेले आहेत. पण त्यांचे लहानपणीचे फोटो कधी पाहिले तर आपण चकित होऊन जातो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर अनेकांना कोड्यात टाकत आहे, या फोटोतील हा छोटासा मुलगा आता साऊथ आणि बॉलिवूडचा स्टार आहे.

तुम्ही त्याला ओळखले का..? या कलाकाराने आपल्या अभिनयाची जादु रसिकांवर खूपच पसरवली आहे त्यामुळे प्रत्येक जण त्याच्यावर खूप प्रेम करतो. तसेच प्रेक्षकांचा त्याच्या प्रत्येक भूमिकेला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मित्रहो आता तुम्ही सुद्धा त्याचे नाव जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक झालेला असणार. तर हा लहान मुलगा आहे साऊथ मधील अभिनयात सक्रिय असणारा सुपरस्टार विजय देवरकोंडा. विजय हा फोटोमध्ये अजिबात ओळखत नाही.

विजयला साऊथ सह बॉलिवूड मध्ये देखील आता हळूहळू पसंती मिळत आहे, शिवाय त्याच्या अभिनयाच्या चर्चा देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत. अनेक प्रेक्षक त्याचे चाहते बनत आहेत. आजवर मिळालेले हे यश त्याच्या मेहनतीचे प्रतीक आहे, त्याने या कलाविश्वात आपले पाऊल घट्ट रोवण्यासाठी अफाट कष्ट घेतले आहेत आणि म्हणून तर त्याच्या कष्टाचे सार्थक होऊन तो आता अवघ्या बॉलिवूड वर अधिराज्य गाजवत आहे.

साऊथ चित्रपटांसह आता विजय कडे बॉलिवूड मधील देखील अनेक चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. तसेच करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या “टायगर” चित्रपटातून विजय देवरकोंडा लवकरच आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील त्यांची धमाल पाहणे खूपच औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच विजयचा अभिनय आणि त्यातील रंजकपणा आपल्या सर्वानाच माहीतच आहे त्यामुळे तर त्याची भूमिका पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत.

“टायगर” या चित्रपटात त्याच्या सोबत बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे, मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्याचा “लाईगर साला क्रॉसब्रीड” हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय हा अनेकांना खूपच आवडतो, पण तो मात्र आता नॅशनल क्रश असणारी रश्मीका मंदाना हिला डेट करत असल्याचा चर्चा सुरू आहेत. पण अजूनही त्या दोघांनी देखील याबद्दल काही भाष्य केले नाही. त्यांची जोडी मात्र खूपच सुंदर आहे, अनेक रसिकांना आवडते.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.