१२००० कोटींची कंपनी मुलाच्या नावे करून स्वतः भाड्याच्या घरात राहतायेत रेमंड कंपनीचे मालक विजयपथ सिंघनिया.

मित्रहो माणूस म्हणल्यावर कधी कधी हातून चूक होणारच, पण खूपदा आपले निर्णय आपल्यालाच महागात पडतात. आज असेच एक उदाहरण आपण जाणून घेणार आहोत, हे उदाहरण अगदी जिवंत असून प्रसिद्ध रेमंडचे मालक विजय सिंघानिया यांच्या जीवनावर आधारित आहे. आजच्या घडीला भारतातील अनेक शहरात रेमंडच्या कपड्यांचे मोठे शोरूम्स पाहायला मिळते. आपली गुणवता कायम राखीव ठेवून लोकांना योग्य दारात, चांगली कपडे प्रदान केली जातात.

रेमंड हे नाव सर्वत्र गाजलेले आहे, अगदी एक ब्रँड म्हणून याचा वापर होतो. पण याला एवढ्या शिखरावर नेणाऱ्या विजय यांनी मात्र आपल्या आयुष्यात भरपूर संघर्ष केला आहे. ही मोठी कंपनी उघडून त्यामध्ये अनमोल असे कष्ट केले आहे. म्हणून तर आता ही कंपनी भारतातील सर्व मोठ्या कंपनीच्या नावांमध्ये गणली जाते. पण विजय यांनी एवढे यश प्राप्त करून देखील त्यांच्या आयुष्यात त्यांनी फार मिठी चूक केली आहे. त्यांच्या एका चुकीच्या निर्णयाने त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून टाकले आहे.

त्यांनी आपल्या आयुष्यातील काही खास गोष्टींचा, तसेच खाजगी जीवनाचा उलगडा करणारे “An Incomplete life” हे आत्मचरित्र लिहले आहे. यामध्ये आपणाला कळून येते की त्यांचे बालपण सावत्र आईजवळ गेले होते, त्यामुळे मायेची ओल नेहमी सुखी राहिली होती. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांचे लग्न झाले होते. आपल्या चुलत भावासोबत त्यांनी अनेक छोटी मोठी व्यवसाये केली, आणि हळूहळू त्यांनी मग रेमंड कंपनीची स्थापना करून आयुष्याची। योग्य घडी बसवली.

वय वाढत असल्याने आता कामातून विसावा घ्यावा या हेतूने विजय यांनी आपल्या मुलावर रेमंडची जबाबदारी सोपवली. त्यांनी ३७.१७ % शेअर्स २०१५ साली त्यांचा धाकटा मुलगा गौतम याला दिले. २००० ते २००१ पासून त्यांच्या कुटुंबात व्यवसायासबंधी बरेच वाद सुरू झाले होते. त्यामुळे नाती दुभंगत चालली होती, शिवाय खूपशा गोष्टी बिघडत चालल्या होत्या आणि अशा वातावरणात व्यवसाय करणे अवघड झाले होते. हा वाद टाळण्यासाठी आणि व्यवसायाचे हित जपण्यासाठी विजय सिंघानिया यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून राजीनामा दिला.

जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा ते लंडनमध्ये होते, आणि इथे त्यांच्या गैरहजेरीत त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला. मात्र जेव्हा ते परतले तेव्हा पिता आणि पुत्र दोघांच्यातही कोणताच संवाद झाला नाही. त्यानंतर त्यांची रेमंडचे अध्यक्ष इमेरिट्स पदी कंपनीने नियुक्ती केली, हळूहळू विजय याना जाणवू लागले की आपल्याच मुलाने आपला विश्वासघात केला आहे. जेव्हा त्यांनी आपल्या मुलाला सर्व अधिकार बहाल केले होते तेव्हा अनेक सहकाऱ्यांनी त्यांना सल्ला दिला होता की असे करण्याआधी विचार करावा.

पण फसवणूक झाल्यावर आता वार्धक्याकडे झुकलेले विजय म्हणतात की तरुणाईला नक्की संधी द्या पण आपण जोवर आहे तोवर आर्थिक व्यवहार, अधिकार कोणाला सोपवू नका. त्यांना त्यांच्या या चुकीचे खूप खेद आहे. खरच मित्रहो आपण आई वडिलांना असे फसवणे चुकीचे आहे, त्यांनी आपल्यासाठी निस्वार्थी होऊन आयुष्यभर मेहनत केलेली असते आणि अखेर त्यांना आपण फक्त प्रेम द्यावे इतकीच त्यांची अपेक्षा असते आणि ती स्वीकारणे एक पाल्य म्हणून आपले कर्तव्य असते. जे आपण पाळणे गरजेचे आहे.