विनोद खन्ना यांच्या या चुकीमुळे संपले त्यांचे करीअर, ५ वर्षांनी परत आल्यानंतर ओळखत न्हवते.

बॉलिवूड इंडस्ट्री मधील अशी खूप सारी नावे आहेत ज्यांनी आजपर्यंत आपल्या अभिनय शैलीतून प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. बॉलिवूड म्हंटल की किस्से आले त्याबद्दलचे धक्कादायक खुलासे आले! त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. मागच्या काही दशकात आपल्या अभिनयाने सर्वाना मोहित करून सोडणारे अभिनेते खूप सारे होते त्यापैकीच एक आहे. बॉलिवूड मधील एकेकाळीचे सुपरस्टार विनोद खन्ना. पण आज जरी विनोद खन्ना आपल्यामध्ये नसले तरी ते सगळ्यांच्या हृदयात कायम आहेत. त्यांच्या अभिनय शैलीतून ते लोकांच्या मनात आज देखील राज्य करतात.

म्हणतात ना की स्टारडम मिळाला की माणूस भांबरल्या सारखा करत असतो. एकेकाळी विनोद खन्ना एक अशी मोठी हस्थि होती की त्यांच्यापुढे अभिताभ बच्चन कोण्हीच न्हवते. परंतु विनोद खन्ना यांनी स्वतःला एका उंचीवर घेऊन गेल्यानंतर स्वतःच्या एका चुकीमुळे स्वतःचे आयुष्य उद्धवस्त करून घेतले. याबद्दल उल्लेख त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केला आहे. विनोद खन्ना यांनी १९८२ मध्ये एका पत्रकार बैठकीत याबद्दल सांगितले होते.

अचानक एका पत्रकार बैठकीत विनोद खन्ना यांनीआपल्या फिल्मी जगताला निरोप घेण्याचे ठरवले होते. एवढी भली मोठी संपत्ती असताना स्वतःचे एक मोठे नाव असताना त्यांनी अमेरिकेत राहणारे आध्यात्मिक गुरु आचार्य रजनीश यांच्याकडे गेले आणि खूप सरळ जीवन जगू लागले. आश्रममध्ये ५ वर्षे परिश्रम, सेवा केल्यानंतर त्यांचे मन उदास होऊ लागले मग त्यांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्याचे ठरवले होते. त्यावेळी मग विनोद खन्ना आध्यात्मिक गुरु आचार्य रजनीश यांचा आश्रम सोडून मुंबईत आले पण तोपर्यंत त्यांचा स्टारडम निघून गेला होता. याचबरोबर त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बिकट बनली होती. अश्या वेळी विनोद खन्ना खूप मानसिक त्रासाचे शिकार झाले.

त्यावेळी ते खूप साऱ्या दिग्दर्शकांकडे मदत मागण्यांसाठी गेले होते. पण त्यांना कोण्हीच मदत केली नाही मग त्यांना पुढे होऊन महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी मदत केली. आणि त्यांना या दोघांचे सहकार्य लाभले.चित्रपटात काम करत असताना त्यांची ओळख कविता दफ्तरशी झाली. त्यांचे प्रेमप्रकरण झुळले. मग १९९० मध्ये त्यांनी एकमेकांशी लग्न केले.