टीव्ही सीरियल मधील ‘वीरा’ आठवते का? आता झाली आहे बरीच मोठी, दिसते खूपच सुंदर..पहा फोटो..

२०१२ ते २०१५ दरम्यान स्टार प्लस वरती एक टीव्ही मालिका प्रसारित करण्यात आली होती, ती म्हणजे ‘एक वीर की अरदास- वीरा’ या मालिकेमधील आपल्या सर्वांना छोटी वीरा नक्कीच आठवत असेल, जिची भूमिका जवळ जवळ सर्व प्रेक्षक वर्गाला आवडली होती. वास्तविक जीवनामध्ये या बालकलाकार मुलीचे नाव हर्षिता ओझा आहे. या मालिकेमुळे तिला चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळालं.

तेव्हा हर्षिताने या मालिकेत काम केले तेव्हा ती फक्त ५ वर्षांची होती. पण हर्षिता आता खूप मोठी झाली आहे. ती खूप सुंदर दिसत आहे. हर्षिताला आता अभिनयाऐवजी गायन क्षेत्रात करिअर करायचं आहे. हर्षिताची लोकप्रियता केवळ भारतातच नव्हे तर इंडोनेशियामध्येही आहे. तेथील लोक तिला वीरा या नावाने ओळखतात. हर्षिताने वीरा शिवाय तमन्ना, सावधान इंडिया, बेइंतहा या सारख्या शो मध्ये हि काम केले आहे.

हर्षिता सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या लाखो आहे. बाल कलाकार म्हणून हर्षिताला इंडियन टेलिव्हिजन अकादमी कडून देश की लाडली अवॉर्ड, एनबीसी एचीवर अवॉर्ड, स्टार परिवार फेवरेट बहन अवॉर्ड मिळाले आहेत. हर्षिताने इंडोनेशियातील तीन मोठ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेत तिथे दमदार प्रदर्शन केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Harshita Ojha (@officialharshitaojha10)

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.