विराट-अनुष्काची मुलगी लागली बोलायला! बोबड्या बोलांनी पहिला शब्द उच्चारला हा…

आईवडिलांसाठी त्यांची मुलं म्हणजे त्यांचं जग असतं. त्यामुळे आपल्या मुलांचे सगळे लाड ते करत असतात. आपल्या मुलांच्या सगळ्या पहिल्या-वहिल्या गोष्टींचं पालकांना खूप कौतुक असतं. आपल्या बाळाने पहिल्यांदा आपलं बोट पकडणं, बाळाचं पहिलं रडणं, बाळाचं पहिलं हसणं, पहिले बोल, पहिले दात येणं, बाळाचं पहिलं पालथं पडणं, पहिलं पाऊल अशा अनेक पहिल्या गोष्टी नजरेत साठवून घेण्यासाठी पालक आतुरलेले असतात.

त्यातही जेव्हा बाळ बोलायला लागतं, तेव्हा तर पालकांनाच आनंद गगनात मावेनासा होतो. बाळ बोबडं बोबडं बोलायला सुरुवात करतं आणि ते पहिल्यांदा कोणता शब्द उच्चारणार हे पाहण्यासाठी सगळेच आतुरलेले असतात. आईवडील तर बाळ आधी ‘आई’ म्हणणार की ‘बाबा’ यावर चर्चा करत राहतात. अनेकदा तर अशा कपल्स मध्ये यावरून पैज देखील लागते. मात्र बाळाने पहिला कोणताही शब्द उच्चारला तरी आईवडिलांना होणारा आनंद वेगळाच असतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

अशा आनंदापासून सेलिब्रेटी कसे वेगळे राहतील! तुम्ही सेलिब्रेटी असा किंवा सामान्य माणूस, पालक असण्याचा आनंद सगळ्यांचा सारखाच असतो. सध्या अशाच आनंदाचे मानकरी ठरलेत अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली. विराट आणि अनुष्काच्या मुलीचे नाव वामिका आहे. या दोघांनीही अजून आपल्या मुलीचा चेहरा जगाला दाखवलेला नाही. मात्र तिचे पाठमोरे फोटो हे दोघे बऱ्याच वेळा शेअर करताना दिसतात. वामिका बद्दलची अशीच एक बातमी अनुष्का आणि विराटने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेअर केली आहे.

विराट आणि अनुष्काची मुलगी वामिका आता हळूहळू बोलायला लागली आहे. आपल्या बोबड्या बोलांनी ती आपल्या आईवडिलांना खूष करताना दिसत आहे. अशातच तिने आपला पहिला शब्द उच्चारला आहे. मंडळी, तुम्हालाही उत्सुकता असेल ना, की वामिकाने पहिला शब्द काय उच्चारला असेल याची? तर वामिकाने पहिला शब्द उच्चारला आहे ‘माँ’. आपल्या बोबड्या बोलांनी तिने पहिल्यांदा आपल्या आईला साद घातली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

वामिकाच्या या बोलांनी विराट आणि अनुष्का यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नसल्याचे दिसत आहे. आपल्या मुलीच्या या बोबड्या बोलांनी विराट-अनुष्काला खूप आनंद झाला आहे. आता आता तर वामिका बोलायला शिकत आहे. विराट आणि अनुष्काला ती नंतर अनेक गोष्टी ऐकवणार आणि आपल्या आईवडिलांना खूष करणार यात शंकाच नाही. लवकरच आपल्यालाही वामिकाचे हे बोल ऐकायला मिळतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.