विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे अलिशान घर आहे तब्बल ‘इतक्या’ कोटींच..किंमत जाणून थक्क व्हाल

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्यांची पत्नी अनुष्का शर्मा यांची सिलेब्रिटींमध्ये एक खास ओळख आहे. या दोघांचे असंख्य चाहत्या वर्ग आहे. हे कपल सोशल मीडियावरही प्रचंड अ‍ॅक्टिव असते. दोघेही सोशल मीडियावर आपले सुंदर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. नुकतच त्यांनी त्यांच्या घराचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.

हे दोन्ही सिलेब्रिटी खूप मोठ्या संपत्तीचे मालक आहे. ते अलिशान आयुष्य जगतात हे स्वाभाविक आहे. हे दोन्ही सिलेब्रिटी कोट्यवधी किमतीच्या घरामध्ये राहतात. त्यांच्या घरामध्ये अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याशिवाय या घराच्या डिझायनिंगमध्ये त्यांनी एकमेकांच्या निवडीचीही विशेष काळजी घेतली आहे.

विराट आणि अनुष्काने 2016 साली मुंबईतील पॉश भागांपैकी एक असलेल्या वरळी येथे आपले आलिशान अपार्टमेंट बुक केले होते. हे जोडपे एका वर्षाने म्हणजेच वर्ष 2017 मध्ये त्यांच्या घरी शिफ्ट झाले. अनुष्का आणि विराटचा हा फ्लॅट अपार्टमेंटच्या 35 व्या मजल्यावर आहे. त्यांच्या अपार्टमेंटच नाव ‘ओंकार 1973’ असे आहे.

अनुष्का आणि विराटचे हे घर 7171 चौरस फूट येवढ्या जागेमध्ये आहे. हे त्यांनी जवळपास 34 कोटी रुपयांमध्ये बुक केले आहे. या फ्लॅटमध्ये एक किंवा दोन नव्हे तर, पूर्ण 4 बेडरूम आहेत आणि त्याशिवाय त्यांना प्रायव्हेट टेरेस देखील आहे. या व्यतिरिक्त या घरात गार्डन देखील आहे. घरामध्येच त्यांनी एका भागात एक लहान जिम देखील स्थापित केली आहे.

घराचे सर्वात मोठ वैशिष्ट्य ते म्हणजे हा बंगला वरळीतील समुद्राच्या अगदी जवळ आहे आणि विराट अनुष्काच्या या बंगल्यातून समुद्राचे एक सुंदर दृश्य समोर दिसते. घरातील इंटीरियर्स देखील विराट आणि अनुष्काने त्यांच्या आवडीनुसार ते बरेच काही अनुकूलित केले आहे. या संपूर्ण घरात लाकडी फ्लोरिंग्ज आहेत. घराच्या भिंतींवर, त्यांनी बरीच सुंदर पेंटिंग्ज एअर पिक्चर्स लावली आहेत.

दरम्यान, विराट अनुष्काने घराच्या आत सजवण्यासाठी अनेक सुंदर वस्तू ठेवल्या आहेत. काही सजावटीच्या वनस्पती देखील लावले आहेत. घराच्या आतच त्यांनी लाईट्स खूप सुंदरपणे वापरल्या आहेत. त्यामुळे घराला एक रॉयल लुक मिळतो आणि घर आतून अधिक आलिशान दिसत आहे.